Saturday, October 31, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

द्वेष मूलक राजकारण हा मुळात भाजपचा मूळ गाभा – सुषमा अंधारे 

पुणे- द्वेष मूलक राजकारण हा मुळात भाजपाचा मूळ गाभा आहे. संसदीय कामकाजात भाजपाच्या खासदाराने सभागृहातील एका मुस्लिम खासदारांना अतिशय गलिच्छ भाषेत अपशब्द उच्चारले. या घटनेबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत भाजपवर टीका केली. संसदीय कामकाज चालू असताना भाजपच्या रमेश बिधुरी या खासदाराने मुस्लिम खासदारांना संबोधत अत्यंत गलिच्छ शिवीगाळ केली आणि भाजपचे सगळे खासदार हे दृश्य बघत राहिले. खरंतर द्वेषमूलक राजकारण हा मुळात भाजपचा मूळ गाभा आहे. ज्या संसदेच्या पवित्र वास्तूमध्ये नेहरू-गांधी पासून ते मनमोहन सिंगा पर्यंत आजपर्यंत लोकहिताचे निर्णय आणि सम्यक चर्चा चालत आल्या त्या पवित्र वास्तूमध्ये मोदीजींच्या कालखंडामध्ये इतक्या गलिच्छ पद्धतीने धार्मिक विद्वेष पेरला जातोय.. !!

Leave a Reply