Saturday, October 31, 2026
BusinessLatest News

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि दुगर पॉवर यांची भागीदारी नेपाळमधील नूतनीकरणीय ऊर्जा उपक्रमांचा वेग वाढवणार

मुंबई :  टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड या देशातील एका सर्वात महत्त्वाच्या नूतनीकरणीय ऊर्जा कंपनीने नेपाळमधील आघाडीचा उद्योगसमूह दुगर ग्रुपची उपकंपनी दुगर पॉवर प्रायव्हेट लिमिटेडसोबत (दुगर पॉवर) एक करार केला आहे. या भागीदारीच्या माध्यमातून टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने नेपाळमधील वेगाने विकसित होत असलेली नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात धोरणात्मक पदार्पण केले असून, पर्यावरणपूरक, शाश्वत ऊर्जेच्या दिशेने नेपाळच्या वाटचालीला वेग प्रदान करण्याच्या दृष्टीने ही भागीदारी खूप मोलाची ठरणार आहे.

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड ही टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या भारतातील एका सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा कंपनीची एक उपकंपनी आहे.

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडसोबत भागीदारीमुळे दुगर पॉवरला नेपाळमध्ये अत्याधुनिक पर्यावरणपूरक, शाश्वत ऊर्जा सुविधा, उपाययोजना एकत्रित करण्यात महत्त्वपूर्ण टप्पा गाठता येईल. ऑन व ऑफ ग्रीड ऊर्जा सुविधांची श्रेणी तयार करण्यासाठी परिवर्तनात्मक सौर तंत्रज्ञान तैनात करण्यासाठी ही भागीदारी सुसज्ज आहे.

ही भागीदारी या क्षेत्रात पर्यावरणपूरक ऊर्जा विकासाप्रती दीर्घकालीन वचनबद्धतेची सुरुवात आहे. नेपाळच्या विविध ऊर्जा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, १ केडब्ल्यूपासून मेगावॅट लेव्हल्सपर्यंत वाढवता येतील अशा सुविधा, उपाययोजना प्रस्तुत करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या भागीदारीमुळे टीपीआरईएलला आपल्या उत्पादनांमध्ये, सेवासुविधांमध्ये वैविध्य आणण्यासाठी नवी क्षितिजे खुली होतील, यामध्ये नेपाळमध्ये सप्लाय सेल्स आणि मोड्यूल्स, इंजिनीयरिंग, प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन तसेच ऑपरेशन्स व मेन्टेनन्स यांचा समावेश आहे.

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचे सीईओ  आशिष खन्ना यांनी सांगितले, “दुगर पॉवरसोबत हा करार एक धोरणात्मक भागीदारी आहे जी नेपाळच्या ऊर्जा क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी तयार करण्यात आली आहे. नेपाळच्या वेगाने विकसित होत असलेल्या नूतनीकरणीय ऊर्जा बाजारपेठेत पदार्पण करत असताना परिवर्तनात्मक प्रभाव घडवून आणण्याची आमची इच्छा आहे. दोन्ही कंपन्यांची नैपुण्ये आणि संसाधने यांचा मिलाप झाल्यामुळे, ही भागीदारी या क्षेत्रात शाश्वत ऊर्जा परिवर्तनासाठी अनुकूल इकोसिस्टिम निर्माण करेल अशी आम्हाला आशा आहे.”

दुगर पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी अभिषेक दुगर यांनी सांगितले, “टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडसोबत आमची भागीदारी एक धोरणात्मक भागीदारी असून, नूतनीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा स्वावलंबन ही नेपाळची दीर्घकालीन उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने ती खूप महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही कंपन्यांचा उद्देश व्यावसायिक हिताच्या पलीकडचा आहे, नेपाळच्या कानाकोपऱ्यात शुद्ध ऊर्जा पोहोचावी यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ही भागीदारी नेपाळला शाश्वत ऊर्जा भवितव्याकडे नेण्याच्या आमच्या अतूट वचनबद्धतेचा पुरावा आहे.”

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड ही शुद्ध ऊर्जा क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे.  त्यांनी जगभरात ३ जीडब्ल्यूपेक्षा जास्त सेल्स आणि मोड्यूल्स पुरवले आहेत. नेदरलँड्समधील ३४११ मेगावॅटपिक, यूएसएमधील ३.३७६ मेगावॅटपिक यासारख्या काही सर्वात मोठ्या आणि युटिलिटी-स्केल आंतरराष्ट्रीय प्रकल्पांना या कंपनीने ऊर्जा पुरवली आहे. नेपाळच्या नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील विशेष नैपुण्ये असलेली दुगर पॉवर देखील त्यांना साजेशी भागीदार आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे नेपाळच्या ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता निर्माण झाली आहे.

ही भागीदारी पारंपरिक व्यावसायिक समन्वयाच्या पलीकडे जाऊन नेपाळच्या नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्राला नवा आकार प्राप्त करवून देण्याच्या धोरणात्मक उद्देशाने करण्यात येत असलेला दूरदर्शी प्रयत्न आहे. टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि दुगर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपन्या नेपाळच्या ऊर्जा क्षेत्राला अतुलनीय उंचीपर्यंत नेण्यासाठी सज्ज आहेत.

Leave a Reply