Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

टेनिक्वाईट (रिंगटेनिस) जागतिक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून अनिल वरपे यांची निवड

पुणे : पाचव्या जागतिक (वर्ल्ड कप) टेनिक्वाईट स्पर्धा प्रिटोरिया ( साऊथ आफ्रिका) येथे दिं. ३० सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान होणार आहेत.सदर स्पर्धा ही युवा (२३वर्षाखालील ) व खुल्या गटात होणार आहेत.या स्पर्धेसाठी पुण्याचे श्री.अनिल वरपे यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.श्री. अनिल वरपे हे महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनचे सचिव तसेच पुणे जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.याचबरोबर टेनिक्वाईट फेडरेशन ऑफ इंडिया रेफरी बोर्डाचे कन्व्हेनर म्हणून काम पहात आहेत. स्वःत राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading