Thursday, September 3, 2026
Latest NewsSports

ब्रिलीयंटस् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी मालिका कायम !!

पुणे :  स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे दुसर्‍या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत ब्रिलीयंटस् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आणि क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीचा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी मालिका कायम ठेवली.सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात कर्णधार आर्य कुमावत याच्या अचूक कामगिरीच्या जोरावर ब्रिलीयंटस् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने विराग क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ८ गडी राखून एकतर्फी पराभव केला. आर्य कुमावत याच्या अचूक गोलंदाजीसमोर विराग क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव पहिल्यांदा फलंदाजी करताना ५९ धावांवर गडगडला. आर्य कुमावत याने १३ धावात ३ गडी टिपले. चिरंतन आराध्ये याने १० धावात २ गडी बाद केलेे. ब्रिलीयंटस् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने ६.४ षटकात व २ गडी गमावून हे आव्हान सहज पूर्ण केले. अंगद ठाकूर (नाबाद २४) आणि श्रेय असलेकर (२२ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

पारूष भागवत याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने डिलीजंट क्रिकेट क्लबचा ४६ धावांनी पराभव केला. कमी धावसंख्येचा हा सामना अतिशय रोमहर्षक झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीचा डाव ९४ धावांवर मर्यादित राहीला. स्वराज पवार (२-१२) आणि ईश्‍वरी बी. (२-१२) यांनी सुरेख गोलंदाजी करताना क्रिकेट नेक्स्ट संघाच्या डावाला वेसण घातली. या आव्हानाला उत्तर देताना डिलीजंट क्रिकेट क्लबचा डाव ४८ धावांवर मर्यादित राहीला. पारूष भागवत (२-११) आणि शौर्य देशमुख (२-१) यांनी चमकदार गोलंदाजी करून संघाचा विजय साकार केला.

वरद पिंपळपुरे याच्या अष्टपैलू खेळीमुळे स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीने फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ५३ धावांनी पराभव करत दुसरा विजय मिळवला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
विराग क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १५ षटकात ९ गडी बाद ५९ धावा (सर्म घुले १०, आर्य कुमावत ३-१३, चिरंतन आराध्ये २-१०) पराभूत वि. ब्रिलीयंटस् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीः ६.४ षटकात २ गडी बाद ६० धावा (अंगद ठाकूर नाबाद २४, श्रेय असलेकर २२); सामनावीरः आर्य कुमावत;

फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ३० षटकात ९ गडी बाद १६२ धावा (सौरभ कांबळे २९, तनय खिंवसरा २९, वरद पिंपळपुरे २-१०, स्वरनभ येवोले २-३१) डीएलएस पद्धतीनुसार पराभूत वि. स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १७.४ षटकात ५ गडी बाद १०९ धावा (सश्रीक दत्ता ३२, आयुष मुंढे २६, वरद पिंपळपुरे १३, केशव नायक २-९, श्रेयस वाघमोडे २-१४); सामनावीरः वरद पिंपळपुरे;

क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः १३ षटकात ८ गडी बाद ९४ धावा (अंश संघवी २६, शौर्य देशमुख १३, स्वराज पवार २-१२, ईश्‍वरी बी. २-१२) वि.वि. डिलीजंट क्रिकेट क्लबः १३ षटकात ६ गडी बाद ४८ धावा (स्वराज पिसाळ नाबाद १३, पारूष भागवत २-११, शौर्य देशमुख २-१); सामनावीरः पारूष भागवत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading