Wednesday, June 10, 2026
BusinessLatest News

अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ २५ सप्टेंबर रोजी खुला होणार

मुंबई :  अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ सोमवार २५ सप्टेंबर २०२३ रोजी खुला होणार आहे.  या आयपीओमध्ये ४,००० मिलियन रुपयांपर्यंतच्या नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी शेयर्सचा आणि समभागांची विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांकडून ८०,००,००० पर्यंतच्या समभागांच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश आहे.

अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख शुक्रवार २२ सप्टेंबर २०२३ निश्चित करण्यात आली आहे. ही ऑफर सोमवार २५ सप्टेंबर २०२३ रोजी खुली होईल व बुधवार २७ सप्टेंबर २०२३ रोजी बंद होईल.

प्राईस बँड प्रत्येकी १ रुपया दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी २८० ते ३०० रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी ५० इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास ५० च्या पटीत इक्विटी समभागांसाठी बोली लावता येतील.

नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून जे भांडवल उभे राहील ते १३३०.०० मिलियन रुपयांच्या थकीत कर्जांच्या परतफेडीसाठी किंवा मुदतपूर्व परतफेडीसाठी; ८०० मिलियन रुपये एनआयडेंटिफाइड इनऑरगॅनिक उपक्रमांसाठी, ११५० मिलियन रुपये खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि   उरलेली रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाईल.

विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये तंगी फॅसिलिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून ४०,००,००० पर्यंत (समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर); इंडिया बिझनेस एक्सेलेन्स फंड – II यांच्याकडून ८,००,००० पर्यंत; आणि इंडिया बिझनेस एक्सेलेन्स फंड – IIए यांच्याकडून ३२,००,००० पर्यंत (समभाग विक्री करू इच्छिणारे इतर समभागधारक) इक्विटी समभागांचा समावेश आहे.

हे इक्विटी समभाग दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी सादर करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात आहेत आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.  या ऑफरसाठी बीएसई हे नियुक्त करण्यात आलेले स्टॉक एक्स्चेंज आहे.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम ६(२) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ७५% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.

नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५% हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. या  ऑफरमधील जास्तीत जास्त १५% भाग क्वालिफाईड नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सना (“नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील त्यापैकी एक तृतीयांश भाग ०.२० मिलियन रुपयांपेक्षा जास्त आणि १ मिलियन रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि यापैकी दोन तृतीयांश भाग १ मिलियन रुपयांपेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि जास्तीत जास्त १०% भाग सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे रिटेल व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहे, पण यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे.

सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे (आरएचपीच्या पान ११ वर नमूद केल्याप्रमाणे), ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशीलवार माहितीसाठी आरएचपीच्या पान क्रमांक ५१४ वरील “ऑफर प्रोसिजर” पहा.

आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अड्वायजर्स लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल्स मार्केट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

या वृत्तातील ज्या संज्ञांचा अर्थ, व्याख्या देण्यात आलेली नाही त्यांचा जो अर्थ आरएचपीमध्ये आहे तोच ग्राह्य मानला जाईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading