भा ज पा कसबा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र काकडे
पुणे -: भारतीय जनता पार्टीच्या कसबा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र काकडे यांची आज नियुक्ती करण्यात आली शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काकडे यांना नियुक्तीचे पत्र दिले
‘पक्षाने ज्या विश्वासाने माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे ती सार्थ करणार कसबा मतदारसंघात परत एकदा भा ज प चाच आमदार निवडून आणेपर्यत तसेच लोकसभा आणि पुणे महानगरपालिकेत सत्ता आणण्यात कसब्याचा नक्कीच सिंहाचा वाटा असणार आहे अशाच प्रकार चे नियोजन आगामी काळात करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले
काकडे हे अनेक वर्षे पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत मागील काळात त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी त्यांनी सचोटीने पार पाडली आहे ही जबाबदारी सुद्धा ते तितक्याच निष्ठेने पार पाडतील असा विश्वास शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी यावेळी व्यक्त केला
