गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एमएटीसी- पैम्पतर्फे श्रीगणेशाची ९९९.९ शुद्ध ५० ग्रॅम नाणी आणि २४ कॅरेट २ ग्रॅम सोन्याचे पेंडंट
पुणे – एमएमटीसी- पैम्प, या भारतातील एकमेव लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (एलबीएमए) गुड डिलीव्हरी सोने आणि चांदी रिफायनर ब्रँडने कायमच भारतातील समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपल्या आहेत. गणेश चतुर्थीचा शुभ दिवस सादरा करण्यासाठी एमएमटीसी- पैम्पने यंदा गणपतीची ९९९.९ शुद्धतेची ५० ग्रॅमची चांदीची नाणी ९९९.९ शुद्धतेचे २ ग्रॅम सोन्याचे (२४के) पेंडंट उपलब्ध केले आहे.
भक्तांच्या मार्गातील अडथळे दूर करणाऱ्या आणि प्रत्येक नव्या कामासाठी त्यांना बळ देणाऱ्या या देवतेचा आशीर्वाद म्हणून ही नाणी खास तयार करण्यात आली आहेत. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांच्या काळात देशभरातील लाखो कुटुंबे एकत्र येऊन आपल्या घरी गणपतीचे स्वागत करतात, त्यांची आवडीची पक्वान्ने बनवतात, भजन- कीर्तनात रमून जातात.
९९९.९ शुद्धतेची ही चांदीची नाणी कलात्मकता आणि अध्यात्मकतेचे प्रतिबिंब आहेत. नाण्याच्या पुढील बाजूस समृद्धीचे प्रतीक असलेल्या लाल, जांभळा, पांढरा आणि सोनेरी रंगांत गणेशाची प्रतिकृती कोरण्यात आली आहे. त्यांच्या उजव्या हातावर भाग्यशाली स्वस्तिक रेखण्यात आले असून आशीर्वादाचे प्रतीक असलेला लाडू त्यांच्या डाव्या हातावर आहे. त्याशिवाय सद्भावनेचे प्रतीक आणि साधी राहाणी व उच्च विचारसरणीचा धडा देणारे बाप्पांचे वाहन म्हणजेच मूषकही त्यावर कोरण्यात आला आहे. नाण्याच्या मागील बाजूस कोरण्यात आलेला वक्रतुंड महाकाय हा मंत्र अध्यात्मकता व बाप्पांच्या आशीर्वादाची प्रचीती देणारा आहे. हे नाणे भक्ती व विश्वासाचे अत्युच्च प्रतीक आहे.

या घोषणेविषयी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सिंग म्हणाले, ‘गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणजेच गणेश चतुर्थी संपूर्ण भारतात मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते. भक्ती, संगीत, नृत्य आणि बहारदार मिरवणुकीचा हा सण सर्वांना एकत्र आणतो. या शुभ दिवसाच्या निमित्ताने भक्तीचे प्रतीक असलेली श्रीगणेशाची चांदीची नाणी लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. एमएमटीसी- पैम्पने कायमच ग्राहकांच्या सांस्कृतिक जडणघडणीला साजेशी वाटतील अशी असामान्य उत्पादने तयार करण्याची परंपरा जपली आहे. आम्हाला आशा आहे, की ही नाणी ग्राहकांना गणेश चतुर्थीचा आनंद वाढवतील, शिवाय त्यांच्यासाठी आशीर्वाद, समृद्धी आणि नव्या आरंभाचे प्रतीक ठरतील.’
ही नाणी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भेट देण्यासाठी आदर्श आहेत. प्रीमियम मिंटेड कार्डमध्ये पॅक करण्यात आलेली ही नाणी प्रियजनांसाठी मोलाचा ठेवा ठरतील तसेच पिढ्यानपिढ्या जपता येतील. या ९९९.९ शुद्धतेच्या चांदीच्या नाण्याचे वेगळेपण स्विस- इंजिनियर्ड तंत्रासह काळजीपूर्वक करण्यात आलेली त्याची सुरेख कलाकुसर, आकर्षक रंग यात दडलेले आहे. यामुळे नाण्याची शुद्धता आणि वजनात कोणतीही तडजोड करण्यात आलेली नसून प्रत्येक नाणे कलेचे प्रतीक आणि चांगली गुंतवणूक राहील.
चांदीच्या नाण्याबरोबरच एमएमटीसी- पैम्पने या खास दिवसानिमित्त गणपतीचे २४ के ९९९.९ शुद्धतेचे सोन्याचे पेंडंट बनवले आहे. अतिशय नाजूक कलाकुसरीसह बनवण्यात आलेले श्रीगणेशाचे हे पेंडंट कलात्मक आणि अर्थपूर्ण आहे. लंबगोल आकाराचे हे पेंडंट परिधान करणाऱ्या भक्ताला भक्ती व दैवी अध्यात्माची अनुभूती देईल. (लिंक)
एमएमटीसी- पैम्पने तयार केलेले प्रत्येक उत्पादन ९९९.९+ शुद्ध धातूपासून बनवण्यात येते. एमएमटीसी- पैम्पच्या प्रत्येक उत्पादनावर त्याच्या अस्सलपणाची खात्री देणारा अनोखा क्रमांक दिलेला असतो व ते असेयर प्रमाणित मिंटेड कार्ड्समध्ये पॅक केले जाते. एमएमटीसी- पैम्पने बनवलेल्या प्रत्येक सोन्याच्या आणि चांदीच्या उत्पादनावर पॉझिटिव्ह वेट टॉलरन्स दिलेला असतो, जी प्रत्येक नाणे किंवा बार निश्चित केलेल्या वजनापेक्षा जास्त असल्याची खात्री असते. ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीचे पूर्ण मूल्य देण्यावर कंपनीचा कटाक्ष असतो.
उत्पादन इथे मिळेल – :
पुणे बाजारपेठेसाठी माहिती एमएमटीसी- पैम्प उत्पादनांविषयी अधिक माहिती एमएमटीसी- पैम्प खास दालने (साई प्लॅटिनम बिल्डींग, लक्ष्मी रोड, सदाशिव पेठ, पुणे, अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन मार्केटप्लेसेस किंवा थेट एमएमटीसी- पैम्पच्या संकेतस्थळावर मिळेल.)
त्याशिवाय एमएमटीसी- पैम्पची उत्पादने आघाडीच्या पार्टनर स्टोअर्समध्ये – रांका ज्वेलर्स, पिंपरी चिंचवड, राठोड ज्वेलर्स, लक्ष्मी रोड आणि बंड गार्डन आणि कामधेनु ज्वेल्स, कॅम्प, पुणे येथे मिळतील.
