Wednesday, June 17, 2026
Latest NewsNATIONALPUNETOP NEWS

तीन बांग्लादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक

पुणे : पुणे आणि परिसरात विनापरवाना  बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर राहात आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे मोशी परिसरातील बो-हाडेवाडी येथे वास्तव्य करणाऱ्या  तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. काल दुपारी ही कारवाई करण्यात आली. पुण्यात बेकायदेशीर  बांग्लादेशी नागरिकांचे वास्तव्य वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सुकांथा सुधीर बागची (२१), नयन बिंदू बागची (२२), सम्राट बलाय बाला (२२, तिघे मूळ रा. बहादूरपूर, पो. दतोकंदवा, जि. मदारीपूर, बांगलादेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम, पारपत्र, परकीय नागरिक आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी फिर्याद दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी भागातील बो-हाडेवाडी येथे असणा-या एका बांधकाम साईटवर काही नागरिक बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने या ठिकाणी जाऊन कारवाई केली. त्यात तीन बांगलादेशी नागरिक या ठिकाणी बेकायदेशीर राहात असल्याचे निदर्शनास आले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे भारतात वास्तव्यास असलेली कोणतीही वैध कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading