नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या श्रींची प्राणप्रतिष्ठा श्रीगौरी सावंत यांच्या हस्ते संपन्न
पुणे : तपकीर गल्ली बुधवार पेठेतील नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या श्रींची प्राणप्रतिष्ठा तृतीयपंथी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांच्या हस्ते संपन्न झाली
यावेळी बोलताना श्रीगौरी सावंत म्हणाल्या की लोकमान्यांनी ज्या उद्देशाने हे उत्सव चालू केले तो उद्देश नेहरू तरुण मंडळ सत्यात उतरवत आहे याचा मनस्वी आनंद होतोय मंडळाने अशी प्रगती करत राहो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली एका तृतीयपंथी व्यक्तीने गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणे ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलीच घटना आहे असे त्यांनी नमूद केले
यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष अशोक मोडक ,नितीन राऊत अविनाश वाडकर शेखर बेहेरे निलेश राऊत पुष्कर तुळजापूरकर हे उपस्थित होते