Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

मयुरी खेळणार राजवीर सोबत मंगळागौर.

सोनी मराठी वाहिनी नेहमीच महिलांच्या वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा असलेल्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेवून येत असते. ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही त्यापैकीच एक आहे. या मालिकेत राजवीर आणि मयूरीची प्रेम कहाणी दिवसेंदिवस सुंदर फुलत चालली आहे. पण राजवीरला भाऊसाहेब म्हणजेच मयूरीचे सत्य समजणार का? किंवा राजवीरला ते कळाले आहे काय ? असे प्रश्न निर्माण करणारे ट्विस्ट आणि टर्न आता मालिकेत पाहायला मिळत आहे. राजवीर चा घरी यामिनी ने पेढीतील महिलांसाठी आणि तिच्या मैत्रिणींसाठी मंगळागौरीचे खेळ ठेवले आहेत. त्यात आता राजवीरने मयूरीला घरच्या मंगळागौरीला बोलावले आहे. त्यामुळे भाऊसाहेबच्या उपस्थितीत मयूरी राजविरच्या घरी मंगळागौरीला जाणार का हे पहाणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. शिवाय हा खेळ जिंकणाऱ्या महिलेला रोख बक्षिसे सुद्धा मिळणार आहे. आता मयुरी कशाप्रकारे सजून मंगळागौरी ले येईल आणि कसे खेळ रंगतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्याशिवाय चक्क यामिनी आणि मयुरी यांच्यात मंगळागौर रंगणार आहे ते देखील प्रेक्षकांना पाहता येईल.

 ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत  भाऊसाहेब म्हणजेच बॉडीगार्डच्या वेशात असताना मयूरी म्हणून राजवीरला भेटण्यासाठी मयूरीला तारेवरची कसरत करावी लागते. आता तर  मंगळागौरीसाठी बोलावले असल्याने मयूरीला खास मराठमोळ्या पारंपरीक वेशात राजवीरच्या घरी जावे लागणार. या दोन वेगवेगळ्या वेशभूशेतील कसरत मयूरी कशी सांभाळणार? त्यासाठी तिला काय काय युक्त्या कराव्या लागतील? का तिची फाजीती होते? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका महाएपिसोड ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’. रविवार, संध्या. ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading