fbpx
Tuesday, September 26, 2023
ENTERTAINMENTLatest News

होम मिनिस्टर @ २०

दार उघड बये दार उघड म्हणत सुरु झालेला होम मिनिस्टरचा हा प्रवास आता २०व्या वर्षात पदार्पण करतोय. आजच्या दिवशी म्हणजे १३ सप्टेंबरला होम मिनिस्टरचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. जवळपास १० लाख किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास, ६००० भाग आणि १२००० घर इतका मोठा पल्ला ह्या कार्यक्रमाने गाठलाय.
ह्या प्रवासाबद्दल विचारलं असता आदेश बांदेकर म्हणतात हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. ६ भागांपुरता मर्यादित असलेला हा कार्यक्रम आता ६००० भाग पूर्ण करतोय. महाराष्ट्रातील स्त्रीचा, वहिनींचा सन्मान करता करता त्या घरात माझंही औक्षण झालं आणि कळत नकळत मीही त्या घराचा सदस्य झालो. प्रत्येक घरात गेल्यावर त्या माऊलीच्या चेहेऱ्यावर प्रसन्न भाव असतो. काही क्षण का होईना पण ती माऊली दिवसभराचं टेन्शन, थकवा विसरून जायची. तुमच्याशी बोलून खूप बरं वाटतं म्हणून कितीतरी जणांनी हॉस्पिटल मधून मला व्हिडिओ कॉल केलेत. मी खरंच खूप स्वतःला भाग्यवान समजतो.
आज पर्यंत या कार्यक्रमाचे २५ हुन अधीक पर्व झालेत ती पुढील प्रमाणे
नांदा सौख्य भरे, पंढरीची वारी विशेष, नववधू नं १, जाऊबाई जोरात, स्वप्न गृह लक्षमीचे, होणार सून मी ह्या घरची, गोवा विशेष, काहे दिया परदेश, चूक भूल द्यावी घ्यावी, अगंबाई सुनबाई, महाराष्ट्र दौरा, भारत दौरा, कोरोना काळात झालेला होम मिनिस्टर घरच्याघरी, कोरोना योद्धा विशेष, सासुबाई माझ्या लईभारी आणि नुकतंच पार पडलेलं महामिनिस्टर हे पर्व विशेष गाजलं कारण वहिनींना मिळणार होती सोन्याची जर असलेली ११ लाखांची पैठणी.

Leave a Reply

%d bloggers like this: