Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

श्री. सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्टच्या निवडणूकीत ‘प्रगती पॅनल’ची बाजी

पुणे : श्री. सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्ट, पुणे रजि.नं. अ-१६ या संस्थेची कार्यकारणी पचवार्षिक निवडणूक रविवार. दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी लोकशाही पध्दतीने आनंददायी, उत्साहात संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये एकुण १६ उमेदवार रिंगणात होते, यपैकी ११ उमेदवारांचा पॅनेल होता व बाकी ५ उमेदवार स्वतंत्र उभे होते.  या संस्थेची मागील २००८ नंतर तब्बल १५ वर्षांनी ही निवडणुक झाली. समाजामध्ये लोकशाही पध्दतीने निवडणूक होत असल्याने समाजात एक आनंदाच वातावरण तयार झाले होते व समाज बांधवांनी, सभासदांनी परिवारसह आनंदाने, उत्साहाने मतदान केले.

या निवडणुकीचा निकाल प्रगती पॅनेलच्या बाजूने लागला या पॅनेल मधील गोपाळ गणपतसा चव्हाण यांना ६६३ मते,  मनोज गुरुनाथसा आरसिध्द यांना ६५२ मते, उमेश हिरालालसा आरसिध्द यांना ६४४ मते, अनिल नारायणसा दामजी यांना ६४३ मते,  संतोष माणिकसा बाळके यांना ६३३ मते,  संजय रामकृष्णसा चव्हाण यांना ६३० मते,  नितीन बाळकृष्णसा धोंगडी यांना ६२१ मते,   राजेश चंद्रकातसा कुक्कर याना ६१० मते,  संदीप राजेंद्रसा वडनेरे यांना ६०४ मते,  प्रशांत चंद्रकांतसा पवार यांना ५९४ मते आणि  संतोष गणपतसा पवार यांना ५७३ मते मिळाली असून सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी झाले, तसेच   राजेश अरुण चव्हाण, योगेश कृष्णनाथसा चव्हाण,  गणेश गगाधरसा दगडू, अरुण गंगारामसा पवार आणि  विनायक माधवसा रोडगे यांना पराजय स्विकारावा लागला. या निवडणुकीमध्ये  प्रमिला वामनसा पवार, ऋचा उमेशसा आरसिध्द,  आशा संतोषसा चव्हाण,  मिना विश्‍वाससा धोंगडी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

विजयी उमेदवारांनी व पराजित उमेदवारांनी एकमेकांना हस्तालोकन करुन एकमेकांना पुढील समाज कार्यकिर्दीस शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित समाजबांधवांनीही निवडूण आलेल्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये   राजेंद्र हिरालालसा आरसिध्द, ॲड. विजय महादेवसा बद्दी, ॲड. निखिल राजूसा आरसिध्द व महाराष्ट्र पोलीस, सल्लागार मंडळ, महिला मंडळ, युवक संघटना, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading