fbpx
Tuesday, October 3, 2023
Latest NewsMAHARASHTRA

‘महाज्योती’च्या ज्ञानदिपकांची यशस्वी गरुडझेप

नागपूर : शिक्षण ही समतेची गुरुकिल्ली असून बहुजन समाजाच्या उत्थानाकरिता प्रत्येक घटकाला समान शिक्षण देणारे तसेच महाराष्ट्रात सुधारणेची पुरोगामी परंपरा सुरू करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा आत्मसात करून आज ‘महाज्योती’चे विद्यार्थी विविध शैक्षिणीक क्षेत्रात यश प्राप्त करीत आहेत. या कामगिरीमुळेच ‘महाज्योती’चे ज्ञानदिपकांची यशस्वी गरुडझेप घेत आहेत. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही मूल्याधिष्ठ शिक्षणाचा प्रसार ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यास तत्पर आहे, अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी दिली.
राजेश खवले यांनी सांगितले की, आयुष्यात उत्तुंग झेप घ्यायची असेल तर शिक्षणाची शिदोरी आणि कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. याचेच प्रत्यय घेऊन महाज्योतीमार्फत गेल्या 4 वर्षात एमएचटी-सीईटी, जेईई, नीट या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, यूपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस-एलआयसीच्या अधिकारी पदासाठी पूर्वतयारी मोफत दर्जेदार प्रशिक्षणही संस्था आज देत आहे. याशिवाय एमएचटी-सीईटी, जेईई, नीटच्या तयारीला लागलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला मदत होण्याकरिता टॅबलेटसह इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, स्पर्धा परिक्षांची तयारी करी असलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत असल्यानेच आज राज्यातील हजारो विद्यार्थी हे प्रगती पथावर गेले आहे, असा विश्वास श्री. खवले यांनी व्यक्त केले. पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना दरमाह पाच वर्षे फेलोशिप देण्यात येत आहे, यातून शेकडो विद्यार्थ्यांना यश प्राप्त करता आले. याशिवाय स्किल डेवलपमेंट मोफत प्रशिक्षणाद्वारे राज्यातील हजारो बहुजन विद्यार्थ्यांना विविध ट्रेडचे मोफत प्रशिक्षण महाज्योतीद्वारे दिल्यामुळे त्यांना विविध कंपण्या, औद्योगिक कारखाने यामध्ये प्लेसपेंटची संधी उपलब्ध झाल्यामुळेच अनेकांचे भविष्य हे सुकर होत आहे, असल्याचेही श्री खवले यांनी सांगितले.
काळ कितीही बदलला तरी शिक्षणाचे महत्व अबाधित आहे. शिक्षणामुळेच आपले स्वप्नांची दारांची चावी मिळविता येते. यानंतरच भविष्यात यशस्वी करीयर घडविण्याचा मार्ग मोकाळा होत असतो. यानंतर विद्यार्थ्यांना शासन सेवेत योग्य ती संधी उपलब्ध करून देण्याचे व्यासपीठ हे ‘महाज्योती’ गेल्या 4 वर्षांपासून करत आहे. बहुजन विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षांची तयारीसह प्रवेश अर्ज भरण्यापर्यंताचे दावित्व स्वीकारत आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्वप्नांचा बहुजन विद्यार्थी हा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात परिवर्तन घडविणारा देदीप्यमान इतिहास निर्माण करणार हे खरेच. बहुजन प्रवर्गातील विद्यार्थी गुणवंत आहेत, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, आयुष्यातील येणाऱ्या आवाहनाचा सामना करण्याचे बळही आहे, पण त्यांना शैक्षणिक प्रशिक्षणासह आर्थिक पाठबळाची साथ देण्याचे कार्य आज महाज्योती यशस्वीपणे करीत आहे, हे सर्व आतापर्यंत गुणवंत विद्यार्थ्यांच्या कामगिरीतून दिसून येत आहे, असल्याचेही महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी सांगितले आहे.

 ‘महाज्योती’ची चार वर्षांची यशोगाथा

‘महाज्योती’मार्फत 2021 साली युपीएससीच्या पूर्व परीक्षेत 44 तर मुख्य परीक्षेत 3 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. तर 2022 मध्ये पूर्व परीक्षेत 34 तर मुख्य परीक्षेत 9 विद्याथी हे उत्तीर्ण झालेत आणि फाॅरेस्टची परीक्षा एका उमेदवाराने पास केली. याशिवाय युपीएससीच्या 2023 या वर्षात पूर्व परिक्षेत 30 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. तसेच एमपीएससी 2021 मध्ये पूर्व परिक्षेत 45 तर मुख्य परीक्षेत 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 2022 मध्ये पूर्व व मुख्य परीक्षेत 112 विद्यार्थी उत्तीर्ण. तर पीएसआयपदाच्या परीक्षेत 61 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. याषिवाय टॅक्स असिस्टंट परीक्षेत 22, एसटीआय परीक्षेत 20, नेट-सेट- परीक्षेत 92, बॅंक भरती परीक्षेत 21 आणि पोलिस पोलिस भरती परीक्षेत 19 विद्यार्थ्यांनी मोलाची कामगिरी बजाविली. त्याचप्रमाणे कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून 6 हजार 235 उमेदवारांना रोजगाराची संधी महाज्योतीद्वारे प्राप्त झालेली आहे.

 युपीएससीच्या तब्बल 68 विद्यार्थ्यांना लाभ

युपीएससीच्या परीक्षेसाठी अर्थ सहाय्य केलेल्या 137 विद्यार्थ्यांपैकी 34 विद्यार्थ्यांची विविध प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाली. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना महाज्योतीतर्फे मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य केल जात आहे. त्यानुसार राज्यातील तब्बल 68 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. महाज्योतीने प्रथम पूर्व आणि मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना 50 हजार रुपये देण्यात आहे.

 एमपीएससी उत्तीर्ण 131 विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू

एमपीएससी परीक्षेसाठी महाज्योतीने अर्थसहाय्य केलेल्या 437 विद्यार्थ्यापैकी 131 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र प्रशासनात विविध विभागात प्रशासकीय पदावर अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यातील 68 विद्यार्थी हे इतर मागास वर्ग, 11 विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती-ब वर्गातील 11 विद्यार्थी, भटक्या जमाती-क मधील 18 तर भटक्या जमाती- ड मधील 20 विद्यार्थ्यांचा तसेच विशेष मागास प्रवर्गातील 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 92 विद्यार्थी एमएच सेट परीक्षेत यशस्वी

महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांसाठी युजीसी-नेट, सीएसआयआर नेट, एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. लक्षीत गटातील विद्यार्थ्यांना प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाची संधी मिळावी या उद्देशाने युजीसी नेट-सीएसआयआर नेट-एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली. प्रशिक्षणासाठी एकूण 1556 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या 1227 विद्यार्थ्यांना ऑफलाईन तर 80 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घेतला. यातील 92 विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. 2021 मध्येे निवड झालेल्या 648 विद्यार्थ्यांना जुलै ते डिसेंबर या कालावधीत तसेच वर्ष 2022 मधे निवड झालेल्या 1236 विद्यार्थ्यांना नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीत एकूण 24 कोटी 17 लक्ष 87 हजार 749 रुपये इतकी अधिछात्रवृत्ती देण्यात आलेले आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: