पिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संघाच्यावतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक रामचंद्र कड यांना प्रदान करण्यात आला. तसेच समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे गायक राहुल शिंदे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ तमाशा फड मालक रघुवीर खेडकर, कलाकार संघाचे अध्यक्ष विजय उलपे, आरती पुणेकर, संजय मगर, राजेश डेव्हिड, कलाकार संघाचे उपाध्यक्ष राजेश जाधव, मिठू पवार, गणेश गायकवाड, अमीर शेख, बाळासाहेब निकाळजे, के.डी. कड, सहसचिव महेंद्र अडसूळ, सहकार्याध्यक्ष अमोल पांढरे, सहकार्याध्यक्ष सॅमसन चंदनशिव, नियोजन प्रमुख दिलीप घोडे, महिला प्रमुख हेमा कोरबरी, शिल्पा भवार, माधवी सातपुते, संपर्कप्रमुख दादा साळवे, प्रसिद्धी प्रमुख देविदास साठे, अभिजीत पुजारी आदी उपस्थित होते.
माजी नगरसेवक शशिकांत कदम यांना समाजभूषण पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकवाड यांना समाजरत्न पुरस्कार, भाजपाचे नेते रामशेठ गावडे यांना समाजसेवक पुरस्कार, ज्येष्ठ तमाशा कलावंत दिलीप धुळेकर यांना तमाशा कला गौरव पुरस्कार, गायिका साधना मेश्राम यांना दिवंगत कवी हरिनंद रोकडे स्मृती पुरस्कार, गणेश खंडागळे यांना आरोग्य मित्र पुरस्कार, मिठू पवार यांना कला मित्र पुरस्कार, गीतकार हरिदास कड यांना उत्कृष्ट गीतकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर शिवशाहीर बाळासाहेब काळजे, दत्तात्रय शिंदे, आशा तेलंग, अर्चना सावंत, चित्रसेन भवार, दिगंबर गरुड, रुपाली पाथरे, आरती चतुर्वेदी, दिलीप घोडे, प्रकाश सुतार, विनायक कडवळे, सुनील पाटील, राजेंद्र ताम्हाणे, डॉ. श्रीधर मोरे यांना कला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त पारंपरिक गण जागरण गोंधळ, महाराष्ट्राची लोकधारा, जादूचे प्रयोग (जादूगार रघुराज), लावणी महोत्सव, ट्रिब्यूट टू रवींद्र जैन संगीत रजनी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मेघराज राजेभोसले म्हणाले, की कलाकार एकत्र आले तर प्रश्न सुटण्यास मदत होईल. कलाकारांनी उद्योग, व्यवसायातही आले पाहिजे. बचतीची सवय लावली पाहिजे.
