Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

सरकारकडून अधिकाऱ्यांची कंत्राटी नोकर भरती म्हणजे महाराष्ट्राला ‘चुना’ लावण्याचा प्रकार – संतोष शिंदे

पुणे : महाराष्ट्रात तरुण बेरोजगार मुला-मुलींची संख्या भरपूर आहे. सरकार सगळ्या खात्यांची वेगवेगळ्या पदांची भरती करायची सोडून शासकीय अधिकारी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा सरकारचा विचार आहे. तसा सरकारी ‘अध्यादेश’ सुद्धा काढण्यात आला असून हा फसवा अध्यादेश आहे. कारण भाजपच्या आमदारांच्या कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आलेला आहे. या सर्व कंपन्यांची चौकशी करून त्यांच्या प्रमुख मालकांचे नाव महाराष्ट्रासमोर आले पाहिजे. शिंदे-फडणवीस-पवार सरकार महाराष्ट्राला फसवत आहे. अशी टीका संतोष शिंदे, प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड यांनी केली आहे. 

शिंदे म्हणाले, एकीकडे आरक्षणाचे आंदोलन सुरू आहे सरकारी नोकऱ्या मिळाव्यात यासाठी संघर्ष सुरू असताना दुसरीकडे कंत्राटी भरती आणायची… याचा अर्थ सरकारच्या गोपनीयतेवर सुद्धा संशय निर्माण होण्याचा प्रकार आहे. कारण कंत्राटी पद्धतीने अधिकारी सरकारची महत्त्वाची माहिती कागदपत्रे ही गायब करण्याचा सुद्धा प्रकार होऊ शकतो.

(महाराष्ट्रासमोर प्रदीप कुलूप कुरुलकर नावाच्या देशद्रोह्याचं उदाहरण समोर आहे.) देशाच्या संरक्षण विभागाचा महाराष्ट्राचा संचालक असताना सुद्धा पाकिस्तानला माहिती पुरवली असाच प्रकार जर उद्या राज्य सरकारच्या कंत्राटी अधिकारी भरतीमध्ये झाला तर याला जबाबदार कोण? सरकारच्या या निर्णयाचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध रद्द करा अन्यथा संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही.

कंत्राटी अधिकारी भरती रद्द करा अन्यथा संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही असे शिंदे यांनी सांगितले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading