fbpx
Saturday, September 30, 2023
ENTERTAINMENTLatest News

Photos : स्टार प्रवाहचे कलाकार जल्लोषात स्वागत करणार गणरायाचं

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३ या गणपती विशेष कार्यक्रमाची यंदाची थीम आहे आरती घराघरातली.

ज्या आरत्या आपण मनोभावाने म्हणतो त्या आरत्या रचल्या कुणी आणि त्यामागची गोष्ट या कार्यक्रमातून दाखवण्यात येईल. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी या कार्यक्रमासाठी काही आरत्यांना नव्याने संगीतबद्ध केलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे स्पर्धक आणि प्रवाह परिवारातल्या कलाकारांनी मिळून बाप्पाच्या आरत्या नव्या अंदाजात सादर केल्या आहेत.

या गणपती विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडलीय मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील सार्थक आणि अबोलीने. गणरायाच्या या जल्लोषात निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यातली धमाल जुगलबंदी कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवणार आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीने मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य प्रत्येक कार्यक्रमातून जपलं आहे. त्यामुळे स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२३ आरती घराघरातली हा कार्यक्रम देखिल पुन्हा एकदा मराठी परंपरेचं दर्शन घडवेल. तेव्हा पाहायला विसरु नका रविवार २४ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजल्यापासून स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३.

Leave a Reply

%d bloggers like this: