माझ्या भूमिकेच्या ब-याच शेड्स आहेत : अक्षय विंचूरकर
ह्या मालिकेबद्दल व तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील ?
-‘तुला शिकवीन चांगलाच’ धडा हि खूप मनोरंजक मालिका आहे. प्रेक्षकांना ही मालिका बघून नेहमी प्रश्न पडत असेल शिक्षण मोठं की पैसे ? ह्या मालिकेत खूप वेगवेगळी पात्र आहेत ज्यांचे वर्णन आणि भूमिका खूप छान फूलवल्या आहेत. जस जशी ही मालिका पुढे जातेय तसं तशी खूप मनोरंजक होणार आहे . मी ह्यात कमल कानफाडे ची भूमिका साकारत आहे. माझ्याही भूमिकेच्या काही शेड्स आहेत. प्रेक्षकांनी माझे पात्र बघितलेच असेल कमलचा पेहराव खूप साधा आहे व त्याच पात्र आधी खूप चांगलं दाखवले गेले पण आता पर्यंत जे मालिकेत ट्विस्ट आले आहेत त्याच प्रमाणे कमलची भूमिका आता नकारात्मकते कडे वळली आहे. एकाच वेळी इतके वैविध्य ह्या भूमिकेत असल्याने ती साकारताना खूप चांगला अनुभव मिळतो.
तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील?
– सगळ्यां कडून खूप शिकायला मिळतं सेटवर आमची खूप मज्जा मस्ती चालते. आमच्या मालिकेत खूप अनुभवी कलाकार आहेत त्यांच्याकडून भरपूर वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. सेटवरचा अनुभव खूप वेगळा असतो त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. सगळे एकत्र छान रिडींग करतात, सगळ्यांचे ताळमेळ एकदम छान जुळून येतात. अगदी आमचं शूट चालू असताना पण धम्माल असते.
तुझा आता पर्यंतचा प्रवास ?
– मी बेडेकर कॉलेज मधून मॅनेजमेंट मध्ये ग्रॅजुएशन केले व मुंबई विद्यापीठातून पॉलिटिक्स मध्ये मास्टर्स केले आहे. बारावी नंतर मी एका नाट्यसंस्थेतून विविध एकांकिका व प्रयोगिक नाटकात काम केले आहे. बरेच प्रायोगिक व व्यावसायिक नाटकाचा भाग होतो. मी चित्रपटात व वेब सीरिजमध्ये काम केलं आहे .आता तर झी मराठीच्या मालिकेत काम करण्याची सुवर्ण संधी भेटली तर मी माझ्या परी ने माझ्या पात्राला पूर्णपणे न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
प्रेक्षकांची तुझ्या भूमिकेला घेऊन काय प्रतिक्रिया असते ?
मला एकदा एक काका भेटले व त्यांनी मला प्रेमाने सांगितले येवढा चांगला राहतोस, इस्त्रीचे शर्ट पॅन्ट घालतो, भांग पाडून केस व्यवस्थित ठेवतो पण अक्षरा सोबत असा का वागतोस ? हे ऐकून मला हसू आले आणि मी त्यांना सांगितले काका मी काय करू माझी भूमिकाच तशी आहे. पण त्या प्रसंगा वरून मला कळले माझे काम लोकांना दिसून येतंय व माझी भूमिका त्यांना कळली आहे. असे बरेच प्रसंग आहे आणि ह्याच प्रसगांमुळे मला प्रेरणा मिळते.
पहायला विसरू नका तुला शिकवीन चांगलाच धडा रात्री ९:३० वाजता फक्त आपल्या झी मराठी वर !