fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsPUNE

वात्सल्य दिव्यांग पुनर्वसन केंद्रात माइंडसेट कोच पंकज भडागे यांची कार्यशाळा संपन्न

पुणे : इनर व्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम यांच्या वतीने वात्सल्य दिव्यांग (गतीमंद)  मुलांचे पुनर्वसन केंद्र,पुणे एम पॉवर माईंडसेट ट्रान्सफॉरमेशन अकॅडमीचे अध्यक्ष आणि  सुप्रसिद्ध माइंडसेट कोच पंकज भडागे यांच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी इनर व्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमच्या अध्यक्ष स्नेहल चोरडिया, समन्वयक प्रीतम लुणावत आदि मान्यवर उपस्थित होते. 

या विशेष कार्यशाळेत  सुप्रसिद्ध माइंडसेट कोच पंकज भडागे यांनी या विशेष मुलांना मार्गदर्शन केले, तसेच मुलांमध्ये सोबत राहण्याची भावना निर्माण व्हावी, त्यांना सुरक्षित वाटावे यासाठीच्या विविध  खेळांच्या माध्यमातूनही मार्गदर्शन केले.  कार्यशाळेत नृत्य आणि अन्य खेळांसाठी प्रियंका पवार यांनी सहकार्य केले. 

या कार्यशाळेला वात्सल्य दिव्यांग (गतीमंद)  मुलांचे पुनर्वसन केंद्रच्या अध्यक्षा वृषाली विलास देवतरसे व सचिव विलास शाहू देवतरसे यांचे विशेष सहकारी लाभले. याप्रसंगी इनर व्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम यांच्या वतीने वात्सल्य संस्थेला त्यांच्या उत्पन्नासाठी सहकार्य म्हणून संस्थेतील मुलांना दिवे बनविण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य, रंग  तसेच अन्नधान्य देण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: