fbpx
Tuesday, September 26, 2023
BusinessLatest News

एंजल वनची नेतृत्व टीमला बळकटी

मुंबई  : सातत्याने उत्क्रांत होत असलेल्या फिनटेक उद्योगातील बाजारपेठेमधील आघाडीचे स्थान अधिक घट्ट करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एंजल वन लिमिटेडने आपल्या नेतृत्वामध्ये मोलाची भर घातली आहे. अॅफिलिएट चॅनल्सचे चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून निशांत जैन यांची, तर नवीन चीफ प्रोडक्ट अँड टेक्नोलॉजी ऑफिसर (सीपीटीओ) म्हणून रवीश सिन्हा यांची नियुक्ती करून कंपनीने ही भर घातली आहे. या दोघांमधील बलस्थानांच्या समन्वयामुळे कंपनीच्या उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांमध्ये अधिक सुधारणा होईल.

निशांत हे आयआयएम-बीचे माजी विद्यार्थी असून, त्यांच्याकडे दोन दशकांचा गाढा अनुभव आहे. भारतपे आणि झोमॅटो यांसारख्या भारतीय स्टार्टअप्सना वाढीच्या दिशेने चालना देण्याचे असामान्य श्रेय त्यांच्या नावावर आहे. एंजल वनमध्ये निशांत अत्यावश्यक भागधारकांच्या साथीने सहयोगात्मक करारांचे नेतृत्व करतील. त्याचबरोबर सहाय्यकारी मार्गांच्या धोरणात्मक वाढीच्या माध्यमातून व्यवसायाची कामगिरी सुधारण्याचे काम करतील.

दोन दशकांहून अधिक दीर्घ कारकीर्द असलेले रवीश हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी फ्लिपकार्ट व याहू अशा उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये वरिष्ठ नेतृत्वाच्या पदांवर उत्कृष्ट काम केले आहे. इंजिनीअरिंगमधील क्लिष्ट आव्हानांवर मात करणे त्यांना विशेषत्वाने आवडत असल्याने एंजल्समधील उत्पादन उद्दिष्टे, धोरणे, डिझाइन, इंजिनीअरिंग, मार्केटिंग व आंतरकार्यात्मक प्रभाव यांमध्ये ते निर्णायक भूमिका बजावणार आहेत.

एंजल वन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  दिनेश ठक्कर म्हणाले, “फिनटेक उद्योग हा गतीशील आहे आणि जलद गतीने उत्क्रांत होत आहे. आपल्याला बाहेरील जगाच्या वेगाशी जुळवून घेणे आवश्यक असते, विशेषत: एक अब्ज आयुष्यांना स्पर्श करण्याचे ध्येय आपल्यापुढे असेल तर ते अधिकच आवश्यक ठरते. निशांत व रवीश हे दोघेही सखोल ज्ञान व त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कौशल्ये घेऊन आमच्या कंपनीत आले आहेत. त्यामुळे आमचा व्यवसाय व उत्पादने अधिक उंचीवर नेण्यात आम्हाला मदत होईल. त्याचबरोबर दिनेश राधाकृष्णन यांनी एंजल वनला दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. त्यांच्या भविष्यकाळासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. डेटा व तंत्रज्ञानाच्या शक्ती जोपासना करून एंजल वन आपल्या सध्या १.५ कोटी असलेल्या व वाढत जाणाऱ्या क्लाएंट वर्गाला अजोड सेवा देईल, असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”

Leave a Reply

%d bloggers like this: