मराठा आरक्षण : जरांगे पाटील राज्य सरकारवर नाराज; उपोषणावर ठाम
जालना : शुक्रवारी रात्री मनोज जरांगे यांचे शिष्ठमंडळ व राज्य सरकार यांच्यात बैठक झाली. त्यानंतर आज मनोज जरांगे काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आज शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर हे सारकारचा नवा जीआर घेऊन जरांगेची भेट घेतली. मात्र जरांगे यांनी आपली सरकारवरील नाराजी बोलून दाखवली. तसेच सरसकट मराठा समाज बांधवांना कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.
जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 12 वा दिवस आहे. जरांगे म्हणाले, राज्यासारकार मराठा आरक्षणा संदर्भात एक एक पाऊल पुढे टाकत आहे. मात्र काल काढलेल्या जी आर चा आम्हाला आरक्षणासाठी उपयोग होणार नाही. सरकारने आपल्या जीआर मध्ये कोणतेही अपेक्षित बदल केलेले नाही. त्यामुळे जोवर जीआर मध्ये बदल होत नाही तोवर उपोषण सुरूच राहणार असल्याचा पुनरुच्चार केला.
लाठीचार्ज करणारे अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही ?
जरांगे म्हणाले, आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजुनही सक्तीची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांना केवळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तर काही आमच्यावर गोळ्या झाडणारे अधिकारी शिष्टमंडळात फिरत आहेत. या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. तसेच आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी ही जरांगे यांनी केली आहे.
आजपासून सलाईन काढणार – जरांगे
सरकार जीआर काढण्यावर तात्काळ कारवाई करताना दिसत नाहीये. चर्चांच्या फेरी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला वेठीस धरणार असल्याचे संकेत दिले आहेत. सरकार जीआर मध्ये बदल करत नसल्याचे समोर येत असल्याने आज पासून सलाईन काढणार असून उद्या पासून पाणीही सोडणार असल्याचे सांगितले आहे.