टॉर्क मोटर्सतर्फे जागतिक ईव्ही दिनानिमित्त पुणे येथे दुसऱ्या एक्सपिरीयन्स झोनचे उद्घाटन
पुणे – जागतिक ईव्ही दिनानिमित्त टॉर्क मोटर्सने वाहतुकीचे स्वच्छ आणि शाश्वत पर्याय उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपण्यासाठी कंपनीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने पुण्यात दुसरे एक्सपिरीयन्स झोन सुरू करत विस्तार केला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केलेले हे केंद्र एस२७३/५, पारिजातक इमारत, बाणेर, पुणे येथे वसलेले आहे. गेल्या वर्षी देशातील पहिल्या टॉर्क एक्सपिरीयन्स झोनचे उद्घाटन करण्यात आले होते व ते लॉ कॉलेजजवळ आहे.
या थ्रीएस केंद्रामध्ये ब्रँडची क्रेटोस-आर मोटरसायकल उपलब्ध केली जाणार असून त्याचबरोबर विक्री तसेच विक्रीपश्चात सेवाही दिल्या जाणार आहे. ग्राहकांना क्रेटोस- आर स्टँडर्ड तसेच अर्बन ट्रिम यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार असून त्याचबरोबर सर्वसमावेशक टेस्ट राइड्सच्या माध्यमातून भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलची क्षमता आजमावता येईल.
याप्रसंगी टॉर्क मोटर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल शेळके म्हणाले, ‘जागतिक ईव्ही दिनाच्या निमित्त आमच्या मूळ कर्मभूमीत दुसरे एक्सपिरीयन्स झोन सुरू करत असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. या केंद्रामुळे ग्राहकांना ईव्ही वाहनाचा समग्र अनुभव देण्याच्या आमच्या मोहिमेला मोठा हातभार लागेल अशी आशा वाटते. या महत्त्वाच्या दिवसानिमित्त टॉर्क मोटर्स ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठीच्या बांधिलकीला आणखी चालना देण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे शाश्वत पर्यावरण आणि ईव्हीचा वापर वाढवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.’
टॉर्क क्रेटोस- आर शहरातील रस्त्यांवर धूम गाजवण्यासाठी सज्ज आहे. लाँचपासून ही मोटरसायकल ट्रेंडसेटर ठरली असून आकर्षक डिझाइन, जबरदस्त पॉवरट्रेन आणि सक्षम चासिस ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ही प्रीमियम कम्युटर मोटरसायकल असून चांगली कामगिरी व हाताळणीबरोबरच तिचा स्पोर्टी स्टान्स ग्राहकांना आकर्षित करतो.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त या मोटरसायकलमध्ये ४.० केडब्ल्यूएच लि- आयन बॅटरी पॅक (आयपी ६७ रेटेड) देण्यात आले आहे, जे ९ किलोवॉट एक्सियल फ्लक्स मोटरला उर्जा देते. याला नुकतेच पेटंट मिळाले असून त्यामध्ये ३८ एनएम टॉर्कसह ९६ टक्के कार्यक्षमता मिळते. यात इको, सिटी आणि स्पोर्ट असे तीन राइड मोड्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे रायडरला त्याच्या शैलीनुसार मोटरसायकलच्या क्षमतेचा वापर करता येतो. आयडीसी श्रेणी १८० किमी (इको मोड) असून क्रेटोस- आर १०५ किमी/तासचा वेग (स्पोर्ट मोडमध्ये) गाठू शकते. त्यामध्ये रिव्हर्स मोडही देण्यात आल्यामुळे रायडरची सोय होते.
या वर्षाच्या सुरुवातील क्रेटोस- आरमध्ये नवे आणि लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. या मोटरसायकलमध्ये पूर्णपणे काळ्या रंगाची मोटर व बॅटरी पॅक, स्टायलिश डिकॅलसह देण्यात आली असून त्याबरोबर वेगवान चार्जिंग सुविधा देणारे पोर्टही आहे. ही मोटरसायकल पाच ट्रेंडी रंगांत उपलब्ध करण्यात आली आहे. टॉर्कने शहरी ग्राहकांसाठी क्रेटोस- आरची शहरी आवृत्ती लाँच केली आहे.
ईएमआय पर्याय केवळ २९९९ रुपये* महिना पासून सुरू होत असून क्रेटोस- आर सर्वांसाठी सहज उपलब्ध व्हावी यासाठी टॉर्क मोटर्सने आघाडीच्या आर्थिक संस्थांशी करार केला आहे. सद्य ग्राहकांनाही फरकाची रक्कम भरून त्यांची मोटरसायकल अद्ययावत करून घेता येईल. ग्राहकांना कंपनीच्या www.booking.torkmotors.com अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन क्रेटोस- आर ऑनलाइन बुक करता येईल.
*प्रत्येक व्यक्तीचा सिबिल स्कोअर आणि शहरात उपलब्ध वित्त योजनांनुसार