Thursday, September 10, 2026
BusinessLatest News

जेएसडब्ल्यू सिमेंट लिमिटेडकडून आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्ष २०२६ चे वित्तीय निकाल जाहीर

मुंबई : जेएसडब्ल्यू सिमेंट लिमिटेडने (“कंपनी”) आज ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे आपले एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीची प्रमुख आर्थिक वैशिष्ट्ये:

  • एकूण विक्रीचे प्रमाण आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीतील ३.७३ दशलक्ष टनावरून वाढून आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत ३.९९ दशलक्ष टन झाले आहे, ज्‍यामध्‍ये वार्षिक ७ टक्‍के वाढ झाली.
  • महसूल: आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत १,८९५ कोटी रुपये झाला असून, जो आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीतील १,७०९ कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक ११ टक्‍के जास्त आहे.
  • ऑपरेटिंग ईबीआयटीडीए: ३६५.० कोटी रुपये, ज्‍यामध्‍ये वार्षिक ४६ टक्‍के वाढ झाली; तर ऑपरेटिंग ईबीआयटीडीए मार्जिन १९.३ टक्‍के राहिले.
  • करोत्तर नफा (पीएटी) / समायोजित करोत्तर नफा (पीएटी)1: ३६१.७ कोटी रुपये.
  • निव्वळ कर्ज: ३१ मार्च २०२६ पर्यंत ३,६३५ कोटी रुपये.

आर्थिक वर्ष २०२६ ची प्रमुख आर्थिक वैशिष्ट्ये:

  • एकूण विक्रीचे प्रमाण १३.९६ दशलक्ष टन झाले असून, यात वार्षिक ११ टक्‍के वाढ झाली आहे.
  • महसूल: वार्षिक १२ टक्‍के वाढीसह ६,५१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
  • ऑपरेटिंग ईबीआयटीडीए: १,२४०.३ कोटी रुपये, ज्‍यामध्‍ये वार्षिक ४४ टक्‍के वाढ झाली; तर ऑपरेटिंग ईबीआयटीडीए मार्जिन १९.० टक्‍के राहिले.
  • समायोजित करोत्तर नफा (पीएटी)1: ६६७.६ कोटी रुपये.
  • लाभांश: वर्षाच्या ६६७.६ कोटी रुपयांच्या समायोजित करोत्तर नफ्याच्या1 आधारावर, संचालक मंडळाने प्रति १० रुपये दर्शनी मूल्य  असलेल्या इक्विटी शेअरवर ०.५ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. हा लाभांश वार्षिक सार्वत्रिक बैठकीत (एजीएम) भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading