Thursday, May 21, 2026
BusinessLatest News

स्टार हेल्थकडून जवळपास २० टक्‍के कमी प्रीमियमसह परवडणारा ‘व्हॅल्यू प्लस’ आरोग्य विमा लाँच

 

चेन्नई : स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NSE: STARHEALTH; BSE: 543412) या भारतातील अग्रणी स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीने आज टियर २-३-४ शहरांमधील तरुण भारतीयांना वाढीव आरोग्य संरक्षण देण्यासाठी एका परवडणाऱ्या विमा सुविधेची घोषणा केली. व्हॅल्यू प्लस नावाच्या या प्लॅनमध्ये रुग्णालय नेटवर्कसह एका विशेष ऑफरद्वारे ७.५ लाख रूपये ते २५ लाख रूपयांपर्यंतचे उच्च विमा संरक्षण जवळपास २० टक्‍के कमी प्रीमियममध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

लहान शहरांमधील लाखो लोकांसाठी आरोग्य सेवेचा वाढता खर्च हा विमा संरक्षणाच्या तुलनेत अधिक वेगाने वाढत असलेल्या बाजारपेठेत, स्टार हेल्थ व्हॅल्यू प्लसच्या माध्यमातून परवडणारे पर्याय उपलब्ध करून देत आहे. उच्च संरक्षण आणि प्रीमियमची किफायतशीरता यांचा समतोल साधत, १८ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रौढांसाठी आणि ९१ दिवस ते २५ वर्षांपर्यंतच्या आश्रित मुलांसाठी कव्हर देऊन वैयक्तिक ग्राहक आणि कुटुंबांना सेवा देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

हे उत्पादन अनेक नॉन मेट्रो शहरांमधील दर्जेदार रुग्णालयांच्या निवडक नेटवर्कमध्ये नियोजित आणि आपत्कालीन उपचारांसाठी प्रवेश मिळवून देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. यासाठी दैनंदिन रुग्णालयीन गरजांशी सुसंगत अशी निश्चित रूम रेंट (खोलीचे भाडे) रचना सहाय्यक ठरेल. ही रचना आवश्यक आरोग्य संरक्षणाशी कोणतीही तडजोड न करता प्रीमियममध्ये किफायतशीरपणा आणते, ज्यामुळे प्रीमियम जवळपास २० टक्‍क्‍यांनी कमी करण्यास मदत होते; तसेच रुग्णालयात दाखल होणे, आजारपणातून सावरणे, क्लेम-मुक्त सातत्य आणि वेलनेस सपोर्ट यांमधील प्रमुख फायदे याद्वारे मिळत राहतात.

या लाँचबाबत मत व्‍यक्त करत स्‍टार हेल्‍थ इन्‍शुरन्‍सचे एमडी आणि सीईओ आनंद रॉय म्‍हणाले:

“गेल्या २० वर्षांत, स्टार हेल्थ इन्शुरन्सने लाखो भारतीयांसाठी आरोग्य विमा अधिक विश्वासार्ह, सुलभ आणि परवडणारा बनवण्यासाठी कार्य केले आहे. व्हॅल्यू प्लसच्या माध्यमातून आम्ही टियर २, ३ आणि ४ मधील भारतातील अधिकाधिक व्यक्ती आणि कुटुंबांच्या आवाक्यात दर्जेदार आरोग्य विमा आणून हाच वारसा पुढे चालवत आहोत. उच्च विमा रकमेचे पर्याय, रुग्णालयांचे निवडक नेटवर्क आणि वेलनेस-आधारित फायदे यांचा मेळ घालत जवळपास २० टक्‍के कमी प्रीमियममध्ये सेवा देऊन व्हॅल्यू प्लस व्यापक ग्राहक वर्गासाठी विशेष नियोजित परवडणारा पर्याय उपलब्ध करून देतो. हे लाँच म्हणजे आरोग्य संरक्षणाचे लोकशाहीकरण करण्याच्या आमच्या ध्येयाचे सातत्य असून सर्वांसाठी विमा हे राष्ट्रीय ध्येय पुढे नेण्याच्या दिशेने टाकलेले एक व्यावहारिक पाऊल आहे.”

 आणि  वर्षांच्या मुदतीत उपलब्ध असलेल्या या प्लॅनच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

  • विमा रकमेचे पर्याय: ग्राहक ७.५ लाख रूपये ते २५ लाख रूपयांपर्यंतचे कव्हर निवडू शकतात.
  • प्रीमियम परतावा: सलग ५ वर्षे कोणताही क्लेम न केल्यास पहिल्या वर्षाचा संपूर्ण मूळ प्रीमियम परत केला जाईल.
  • एकत्रित बोनस: प्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी ५० टक्‍के विमा रक्कम जोडली जाईल, जी कमाल १०० टक्‍क्‍यांपर्यंत जमा होऊ शकते.
  • दीर्घकालीन पॉलिसीचे फायदे:
    • दीर्घकालीन पॉलिसी निवडणारे ग्राहक पॉलिसीच्या मुदतीदरम्यान वार्षिक विमा रक्कम एकत्रित करण्यासाठी आणि वापरण्यासाठी सम इन्शुरड मल्टिप्लायरचा वापर करू शकतात.
    • दुसऱ्या वर्षाच्या प्रीमियमवर 10% आणि तिसऱ्या वर्षाच्या प्रीमियमवर 12.3% दीर्घकालीन सवलतीचा लाभ घ्या.
  • हेल्थ बूस्टर: प्रत्येक सलग ७ क्लेम-मुक्त वर्षांच्या ब्लॉकवर १०० टक्‍के मूळ विमा रक्कम जोडली जाईल.
  • रुग्णालयात दाखल होणे आणि बरे होण्यासाठी सहाय्य: इन पेशंट हॉस्पिटलायझेशन, डे केअर, आयुष, होम केअर, अवयव दाता, हॉस्पिटलायझेशनपूर्वीचा आणि नंतरचा खर्च, रुग्णवाहिका, नर्सिंग आणि टिकाऊ वैद्यकीय उपकरणे.
  • वेलनेस-आधारित फायदे: अमर्यादित टेलि कन्सल्टेशन्स, नूतनीकरणावर २० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत, दातांची तपासणी, सेकंड ओपिनियन (दुसरा वैद्यकीय सल्ला) आणि डिजिटल व्हॅल्यू-अॅड्स (value-adds).
  • सानुकूलनाचे पर्याय: डिडक्टिबल्स, को-पे, इन क्लिनिक कन्सल्ट्स, स्टे फिट (जिमचा अॅक्सेस), ममता (महिलांचे वेलनेस) आणि परम सेवा (ज्येष्ठ नागरिकांचे वेलनेस).

व्हॅल्यू प्लसच्या माध्यमातून, स्टार हेल्थ उच्च संरक्षण आणि परवडणारे दर यांचा समतोल साधणारा आरोग्य विमा देण्याचा आपला प्रस्ताव अधिक पक्का करत आहे. उच्च कव्हर, क्लेम मुक्त मूल्य लाभ, वेलनेस सपोर्ट आणि निवडक व्हॅल्यू नेटवर्क यांना एकत्रित करत हा पर्याय कुटुंबांना अधिक प्रीमियम-कार्यक्षम पद्धतीने अर्थपूर्ण आरोग्य संरक्षण मिळवून देण्यासाठी डिझाइन केला गेला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading