Physiotherapy Day : फुफुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी फिजिओथेरपी उपचारपद्धती प्रभावी
कोविड संसर्गानंतर फुफुसांची कार्यक्षमता प्रचंड कमी झाले आहे. त्यामुळे फुफुसांची कार्यक्षमता वाढवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी फिजिओथेरपी ही एक चांगली उपचार पद्धती आहे. फिजिओथेरपीमध्ये विविध उपचार पद्धती आहेत. पाठीच्या दुखण्यामध्ये मुख्यत्वे वेगवेगळी कारणे आहेत. लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, तणाव, स्नायूंची ताठरता, चुकीच्या पद्धतीच्या बैठकी यामुळे हाडे किंवा स्नायू दुखू लागले, तर फिजिओथेरपीच्या काही विशिष्ट दिवसांच्या उपचारानंतर हे दुखणे आटोक्यात येते. मात्र, या आजाराची मूळ कारणे शोधून काढून त्यावर फिजिओथेरपिस्टने सांगितल्यानुसार सवयी, तसेच जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते. खूप जड वस्तू उचलणे व तासनतास एका जागी बसून राहिल्यानेही पाठीवर ताण येऊन पाठ दुखू लागते.
– (लेखिका तळेगाव येथील मेयर्स फिजिओथेरपी महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.)