Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

धनगर आरक्षण : आक्रमक कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर उधळला भंडारा

सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांनी प्रलंबीत असल्याने धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधळला आहे. शुक्रवारी सोलापूर शासकीय विश्रामगृहात ही घटना घडली आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोलापुरात आले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. अशातच अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी तिथे येत होते, आपले प्रश्न मांडत होते. ते लोकांची निवेदने स्विकारत होते. अशातच धनगर आरक्षण कृती समितीच्या काही सदस्यांनी कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन त्यांना देण्याची विनंती केली. हे निवेदन राधाकृष्ण विखे पाटील स्विकारत असताना कार्यकर्त्यांनी अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळत आरक्षण देण्याची घोषणा दिल्या.

राधाकृष्ण विखे पाटील निवेदनाचे वाचन करत असताना बंगाळे यांनी सर्वांचीच नजर चुकवून खिशातील भंडारा काढून  विखे पाटलांच्या अंगावर टाकला व घोषणा दिल्या. त्यावेळी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह सुरक्षारक्षक यांनी बंगाळे यांना मारहाण केली. नंतर पोलिसांनी बंगाळे यांना ताब्यात घेतले.

धनगर आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. सरकार केवळ घोषणाच देत आहे, मात्र त्यासंदर्भात कोणतीही अंमलबजावणी करत नाही, असा आरोप धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांचा आहे. याच मागणीसाठी विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

हा प्रकार घडताच तिथेच असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना जोरदार मारहाण सुरू केली. बंगाळे यांना खाली पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवण्यात आले. त्यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा दिल्या. या घडलेल्या प्रकारानंतर विखे पाटलांनी पत्रकारांना सांगितले की, माझ्यासाठी हा भंडारा चांगलाच असून धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading