Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune : दहीहंडीमुळे शहरातील वाहतुकीत बदल

पुणे : आज दहिहंडी उत्सवामुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठा बदल केला आहे. शहराच्या मध्य भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक सायंकाळी ५ ते दहीहंडी संपेपर्यंत वाहतूक वळविली असून, वाहनचालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

पुण्यातील दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिक येतात. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी पुणेकरांना मोठा वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो, हीच बाब लक्षात घेता यंदा दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल केले आहेत. बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक होणार आहे. तसेच, मजूर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजूर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई अशा रस्त्यांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून (police) करण्यात आले आहे.

तसेच, शहरातील पीएमपी बस मार्गातदेखील मोठे बदल केले आहेत. बसमार्ग क्र. ५० शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून जाणार आहे. तर बस मार्ग क्र. ११३ अ. ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर मनपा भवन स्थानकावरून जाणार आहे. याशिवाय बस मार्ग क्र. ८, ९, ५७, ९४, १०८, १४३, १४४, १४४ अ या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, मनपा भवन, गाडीतळ या मार्गाने जाणार असल्याची माहिती आहे. तर बस मार्ग क्र. १७४ ही बस रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ मनपा, डेक्कन मार्गे धावणार आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading