जावा येझदी मोटरसायकल्स तर्फे नवीन टॉप-ऑफ-द-लाइन जावा 42 बॉबर ब्लॅक मिरर सादर
पुणे : ‘बॉबर’ सेगमेंटमध्ये आपला दबदबा वाढवत जावा येझदी मोटरसायकल्स दिमाखात नवीन जावा 42 बॉबर ब्लॅक मिरर सादर करत आहे. बॉबर रेंजच्या अग्रणी असलेल्या ‘फॅक्टरी कस्टम’ लाइन-अप स्लॉट्समध्ये हा वैशिष्ट्यपूर्ण मास्टरपीस म्हणजे एकदम अत्याधुनिक भर आहे. रायडर्सना कालातीत डिझाइन, प्रगत कामगिरी आणि अतुलनीय आराम यांचे एकत्रित सादरीकरण करण्याच्या ब्रँडच्या समर्पित भावनेचे हे प्रतीक आहे. जावा 42 बॉबर ब्लॅक मिरर आता एक्स-शोरूम दिल्ली मध्ये २,२५,१८७ रुपयांपासून उपलब्ध आहे.
जावा 42 बॉबर ब्लॅक मिररचे एक वेगळेच स्थान आहे. त्याची क्रोम टँक जुन्या जावाची आठवण करून देते, आणि प्रीमियम डायमंड कट अलॉय व्हील कोणत्याही रस्त्यावर उभे राहील हे सुनिश्चित करते. आज भारतातील रस्त्यांवरील ही सर्वात इष्ट मोटरसायकल आहे. जावा 42 बॉबर ब्लॅक मिररने “Oneness” ची संकल्पना अबाधित ठेवली आहे. रायडिंग म्हणजे केवळ मौजमजेची गोष्ट नाही, तर तो आपल्या कृतीचा एक मार्ग ठरतो. प्रत्येक खरा रायडर स्वतःशी रस्ता, वारा, मशीन, आकाश यांच्या बरोबर एकरूप होऊ पाहत असतो. एकत्व भावनेचा ते आयुष्यभर पाठपुरावा करतात आणि पुन्हा पुन्हा शोध घेतात. नवीन 42 बॉबर ब्लॅक मिरर या भावनेचे मूर्त स्वरूप आहे.
कामगिरीतील सुधारणा 42 बॉबर ब्लॅक मिररमध्ये अंतर्भूत आहे. त्यात पूर्वीच्या ३३ मीमीच्या तुलनेत ३८ मिमीच्या प्रगत थ्रॉटल बॉडीचा समावेश आहे. रायडर्सना पूर्वीच्या १५०० वरून १३५० पर्यंत कमी केलेल्या आयडलिंग RPMसह सुधारित इंजिन देखील भावेल. अद्ययावत इंधन नकाशा, पुन्हा डिझाइन केलेले गियर आणि इंजिन कव्हर्स आणि प्रीमियम ट्यूबलेस डायमंड-कट अलॉय व्हील्स यामुळे मोटरसायकलची चालवण्याची क्षमता आणखी वाढली आहे. शेवटी अधिक आरामदायी राइडसाठी मागील मोनोशॉक अधिक चांगल्या डॅम्पिंग फोर्ससह पुन्हा डिझाइन केले गेले आहे.
जावा 42 बॉबर ब्लॅक मिररसाठी कामगिरी सर्वोत्तम आहे. त्याच्या 334cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर मोटरसह, रायडर्स शक्तिशाली 29.9PS आणि 32.7Nm ची अपेक्षा करू शकतात. या पॉवरचा वापर 6-स्पीड ट्रान्समिशनसह केला जातो आणि अधिक सौम्य शिफ्ट आणि हलका क्लच कृतीसाठी सहाय्यक आणि स्लिपर क्लचसह सुधारणा होते.
तरीही, शक्ती हा या मोटरसायकलचा फक्त एक पैलू आहे. जावा 42 बॉबर ब्लॅक मिरर रायडरच्या आरामाची पुरेशी खबरदारी घेते. विविध प्रकारच्या रायडर्ससाठी अनुकूल त्याच्या अॅक्सेसीबल 740 मीमी आसन उंची आणि अॅडजस्टेबल सीट वरून हे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, ब्लॅक मिररवरील मानक असलेले प्रीमियम डायमंड-कट अलॉय व्हील्स सध्याच्या 42 बॉबरच्या मालकांसाठी अपग्रेड म्हणून देखील उपलब्ध असून ते ब्रँडच्या आपल्या समर्पित ग्राहकांच्या बांधिलकीला अधोरेखित करतात.
जावा येझदी मोटरसायकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष सिंग जोशी यांनी या सादरीकरणाबद्दल उत्कटतेने सांगितले. ते म्हणाले, “गेल्या वर्षी जावा 42 बॉबरच्या यशस्वी सादरीकरणामुळे, आम्ही बॉबर विभागात आमचे वर्चस्व आणखी मजबूत केले. आमच्या फॅक्टरी कस्टम पोर्टफोलिओमधील बॉबर स्टेबलला भारतातील रायडिंग समुदायाकडून मोठा चाहता वर्ग लाभला आहे. 42 बॉबरसाठी आम्हाला मिळालेल्या प्रेमाने आम्हाला नवीन जावा 42 बॉबर ब्लॅक मिरर सादर करण्यासाठी डिझाइन आणि अभियांत्रिकीमध्ये सगळ्या सीमा पार करता आल्या. बॉबर्स व्यक्तित्व आणि वेगळेपणाला सार मूर्त रूप देतात. भावनिकतेने त्यांची खरेदी केली जाते आणि नवीन जावा 42 बॉबर ब्लॅक मिरर हे बॉबर्स इतके खास का आहेत याचे उत्तम उदाहरण आहे. तपशीलाकडे बारकाईने लक्ष देत अनोख्या डिझाइन भाषेसह एकत्र करणे याला खऱ्या अर्थाने वेगळे बनवते.”
ज्यांना आपली राईड पर्सनलाइझ करायची आहे त्यांच्यासाठी जावा 42 बॉबर विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून त्यात जॅस्पर रेड ड्युअल टोन, मूनस्टोन व्हाइट, मिस्टिक कॉपर आणि अर्थातच ब्लॅक मिरर यांचा समावेश आहे.
मोटारसायकलिंगच्या सतत बदलत्या परिक्षेत्रामध्ये जावा येझदी मोटरसायकल्स केवळ वाहतुकीच्या पलीकडे जात कलेचा उत्तम नमुना म्हणून आपल्या कामात टिकून राहिली आहे.
जावा 42 बॉबर ब्लॅक मिररची किंमत २,२५,१८७ (एक्स-शोरूम दिल्ली) असून आता सर्व जावा येझदी मोटरसायकल डीलरशिपवर बुकिंगसाठी उपलब्ध आहे. अधिक तपशीलांसाठी किंवा चाचणी राइडची व्यवस्था करण्यासाठी, उत्साहींना त्यांच्या जवळच्या डीलरशिप किंवा जावा येझदी मोटरसायकलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यास प्रोत्साहित केले जाते.