Wednesday, July 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ व्हिडिओ प्रकरणी पत्रकारांवर गुन्हा दाखल

मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान  भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हायरल व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने प्रसारीत केला होता. या वृत्ताचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. दरम्यान याप्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई करू असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. दरम्यान एका महिन्यांच्या विश्रांतीनंतर या प्रकरणात आता त्या वाहिनीचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

किरीट सोमय्या यांचा   हा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान ठाकरे गटाकडून विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी केली होती. मात्र, हे प्रकरण चौकशीसाठी ठेवण्यात आले होते. या चौकशीअंती व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार आणि त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हायरल व्हिडीओ प्रसारित करण्यात आला होता. या प्रसारणानंतर महाराष्ट्रातील राजकारणात वादंग उठले होते. दरम्यान चौकशीअंती तो व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिनीचे संपादक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर भादवि कलम 500 आणि माहिती तंत्रज्ज्ञान कायद्याच्या कलम 66 (E) आणि 67 (A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुच त्या वृत्तवाहिनीच्या संपादकांवर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणाला मंगळवारच्या रात्री मोठी गती मिळाली. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांनी तपास पूर्ण करून किरीट सोमय्या यांचा जवाब नोंदविला. त्यानंतर त्या वृत्तवाहिनीचे संपादक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हायर व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे एक पेनड्राईव्ह देऊन कारवाईची मागणी केली होती. दरम्यान आता तो व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिनीच्या संपादकांवरच गुन्हा दाखल झाला आहे तर मग त्या पेनड्राईव्हमध्ये आहे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading