उद्या दहिहंडीनिमित्त पीएमपीएमएल च्या काही बसमार्गांत बदल
पुणे : सालाबाद प्रमाणे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी उद्या (गुरुवार) दहिहंडी निमित्त वाहतुक पोलीस यांच्या सुचनेनुसार पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणाहुन सचंलनात असलेल्या बस मार्गात तात्पुरत्या स्वरूपात बदल करून बस संचलन सुरू ठेवण्यात येणार आहे.
त्याचा तपशील खालील प्रमाणे
1. बसमार्ग क्र. ५० शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून संचलनात राहतील.
2. बस मार्ग क्र. ११३ अ.ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर म.न.पा. भवन स्थानकावरून संचलनात राहतील.
3. बस मार्ग क्र. ८, ९, ५७, ९४, १०८, १४३, १४४, १४४ अ या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, म.न.पा. भवन, गाडीतळ (जुना बाजार) या मार्गाने संचलनात राहतील.
4. मार्ग क्र. १७४ दिनांक ०६/०९/२०२३ व ०७/०९/२०२३ रोजी रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ (जुना बाजार) म.न.पा., डेक्कन मार्गे संचलनात राहील.
5. बस मार्ग क्र. २ , २ अ, १०, ११, ११ अ, ११ क, १३, १३ अ, २८, ३०, २०, २१, ३७, ३८, ८८, २१६, २९७, २९८, ३५४, रातराणी-१, मेट्रो शटल-१२ या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर शिवाजीनगरकडुन स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रोड, डेक्कन, टिळक रोड मार्गे संचलनात राहतील. मात्र स्वारगेटकडुन शिवाजीनगरला जाताना वरील मार्गावरील बसेस मार्गाने बाजीराव रोडने संचलनात राहतील.
6. बस मार्ग क्र. ७, १९७, २०२ या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
7. बस मार्ग क्र. ६८ या मार्गाचे बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
8. स्वारगेट आगाराकडुन बस मार्ग क्र. ३ व ६ हे दोन बस मार्ग दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येईल.
तरी उद्या वरील बदलाबाबतची नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नोंद घेवुन परिवहन महामंडळास सहकार्य करावे.
