fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

गणेशोत्सव कालावधीमध्ये महिला व लहान मुलांना मेट्रोच्या तिकिटात सूट द्यावी

शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागणी

पुणे : शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणाऱ्या गणेशोत्सवासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक भाविक दरवर्षी येतात यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुणे मेट्रोचा प्रवास कालावधी रात्री बारा वाजेपर्यंत निश्चित केली आहे. तरी ही वेळ वाढवून मिळावी आणि गणेशोत्सव कालावधीमध्ये महिला व लहान मुलांना मेट्रोच्या तिकिटात सूट द्यावी, अशी मागणी अखिल मंडई मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मेट्रोसाठी वेळ वाढवून दिल्यामुळे भाविकांना शहराच्या मध्यवर्ती भागात येणे जाणे अधिक सोयीस्कर होईल व वाहतूक विभागावर होणारा ट्रॅफिकचा अनावश्यक ताण कमी होण्यास मदत होईल.
अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सव काळात शहराच्या मध्यवर्ती भागात गणपती पहायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे मेट्रोचा कालावधी आणखी वाढविण्यात यावा. अशी मागणी आम्ही केली आहे.  गणेशोत्सव कालावधीमध्ये महिला व लहान मुलांच्या मेट्रोच्या प्रवास तिकिटात विशेष सूट देण्यात यावी जेणेकरून मेट्रो प्रवासाच्या आनंदा सोबतच त्यांना पुण्याच्या इतर भागातून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात अत्यंत सुरक्षितपणे ये-जा करण्यास प्रोत्साहन मिळेल.

Leave a Reply

%d