fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

यू.एस.पोलो असोसिएशन ने भारतातील आपली नेतृत्वाची स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने आयकॉनिक लीजेंड्स कॅम्पेन लाँच केली

पुणे – यू.एस. पोलो असोसिएशन,युनायटेड स्टेट्स पोलो असोसिएशन आणि अरविंद फॅशन्स लिमिटेड (ARVINDFA: IN) चा अधिकृत ब्रँड यांना भारतातील दोन प्रमुख व्यावसायिक टप्पे , आयकॉनिक लीजेंड्स मार्केटिंग कॅम्पेन आणि नवीन यू.एस. पोलो असोसिएशन वेबसाइट लाँच, जाहीर करताना अभिमान वाटत आहे. दोन्ही व्यवसाय धोरणे भारतातील यू.एस. पोलो असोसिएशन ला पुढील स्तरावर नेण्यात मदत करण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.

ब्रँडची वाढीची रणनीती ब्रिक आणि मोर्टार, ओम्नी-चॅनल आणि ई-कॉमर्स तसेच स्टोरीटेलिंगद्वारे एकूण ब्रँड मार्केटिंगवर केंद्रित आहे. भारतातील आघाडीच्या कॅज्युअल वेअर पॉवर ब्रँडपैकी एक म्हणून, अब्जावधी-डॉलर, जागतिक, क्रीडा-प्रेरित यू.एस. पोलो असोसिएशन ने ग्राहकांसाठी डिजिटल ऑफर अधिक वाढवण्यासाठी आणि त्याच्या उत्पादन ऑफरमध्ये सुलभ प्रवेश देण्यासाठी एक विशेष ब्रँड-विशिष्ट वेबसाइट uspoloassn.in लाँच केली आहे. यू.एस. पोलो असोसिएशन अरविंद फॅशन्स लिमिटेड ब्रँड्स पोर्टफोलिओमधला हा पहिला ब्रँड आहे जो एका खास ब्रँड वेबसाइटवर लाइव्ह जातो. सध्या, ब्रँड सर्व आघाडीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि NNNow.com, वर सूचीबद्ध आहे, जे अधिकृत ब्रँड स्टोअर आणि अरविंद फॅशन्स लिमिटेडचे डिजिटल गंतव्यस्थान आहे.

जे. मायकल प्रिन्स, युएसपीए ग्लोबल लायसन्सिंग, यू.एस.पोलो असोसिएशन चे व्यवस्थापन आणि देखरेख करणाऱ्या कंपनीचे प्रेसिडेंट आणि सीईओ म्हणाले“अरविंद फॅशन्स हे यू.एस. पोलो असोसिएशन ब्रँडचा जबरदस्त भागीदार आहे , आणि आम्ही एक पॉवर ब्रँड म्हणून आमच्या भविष्याबद्दल उत्साहित आहोत, जे जगातील सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एकामध्ये दीर्घ कालावधीसाठी अब्ज डॉलर्सच्या व्यवसायाला लक्ष्य करत आहे. भारतातील आमच्या धोरणात्मक योजनेच्या अंमलबजावणीमुळे देशातील टॉप कॅज्युअल वेअर ब्रँडपैकी एक म्हणून आमची स्थिती आणखी मजबूत होईल.”

कुलीन लालभाई, वाइस चेअरमन अँड नॉन-एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर, अरविंद फॅशन लिमिटेड म्हणाले, “2000 कोटींच्या जवळपास महसुलासह, यू.एस. पोलो असोसिएशन ही भारतातील पुरूषांच्या कॅज्युअल वेअर सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. ब्रँड वेबसाइट लाँच, नवीन आयकॉनिक लेजेंड्स जाहिरात कॅम्पेन आणि नवीन उत्कंठावर्धक समीप उत्पादन श्रेणी तयार करणे यासह अनेक प्रयत्नांद्वारे ब्रँडला उर्जा देण्यासाठी आम्ही आणखी गुंतवणूक करत आहोत. ”

Leave a Reply

%d