fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsPUNE

एकता आणि बंधुतेच्या जनजागृतीसाठी युनिटी राईडचे आयोजन…

पुणे: पुण्यातील विविध बाइकिंग क्लबमधील १४० पेक्षा जास्त उत्साही मोटरसायकलस्वारांचा गट बंधुत्व आणि एकतेचा प्रचार (युनिटी राईड) करण्यासाठी एकत्र आला होता. स्वारगेट ते वाई (सातारा) अशी ही युनिटी राईड होती. अपोलो टायर्स आणि रेडॉन रायडर्स यांच्या संयुक्त सहकार्याने युनिटी राईडचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे युनिटी राईटचे दुसरे यशस्वी वर्ष होते. तसेच  आपल्या मातृभूमीला वंदन करण्यासाठी आणि शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच ‘मेरी माती, मेरा देश’ या मोहिमेबद्दल जनजागृती करण्यासाठी रेडॉन रायडर्सने त्याचवेळी एका विशेष बाईक रॅलीचे आयोजन केले होते.
युनिटी राईट चा उद्देश पुण्यातील सर्व श्रेणीतील मोटरसायकल ग्रुपला एकत्र आणणे त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या मजेशीर ऍक्टिव्हिटी करून सर्वांना चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि एक मजबूत बंधुत्व प्रस्थापित करणे हाच उद्देश होता.
पुण्यातील बाइकिंग बांधवांमध्ये एकता दाखवण्यासाठी आणि  पुण्यातील विविध मोटरसायकल गटांना एकाच छताखाली एकत्र आणण्यासाठी सैफ सय्यद यांनी विशेष मोलाचे यशस्वी प्रयत्न करून मागील वर्षी सर्वांना घेऊन यासाठी एक ग्रुप स्थापन केला.
यावेळी ‘मातृभूमीची माती आपल्या सर्वांना बांधते’ अशी शपथ सर्वांनी घेतली. रेडॉन रायडर्स भारतीय सैन्याने वॉर मेमोरियल, पुणे येथे आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या रॅलीत देखील सहभागी झाला होता. तुम्ही अधिकृत वेबसाइट https://merimaatimeradesh.gov.in/  वर जाऊन आणि तुमचा राष्ट्रध्वज फडकावतानाचा फोटो/ दीया/मातीसह चित्र/ रोपासह चित्र अपलोड करून देखील शपथ घेऊ शकता.अशी माहिती अशी माहिती तसेच त्याचे नेतृत्व रेडॉन रायडरचे ग्रुप कॅप्टन अफजल हयात  आणि स्मिता मॅस्केरहन्स यांनी दिली
स्वारगेटच्या “अपोलो” शोरूम येथून निघलेले रायडर्स वाई जवळील हौसाई ऍग्रो टुरिझम येथे पोहचताच त्यांचे फटाके फोडून, तुतारी वाजवून व आकर्षक रंग उधळून, महिलांना औक्षण करून, जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्वांसाठी मोफत ब्रेकफास्ट  , गिफ्ट आणि वेगवेगळ्या स्पर्धा, सर्टिफिकेटसह मजेदार गोष्टींच्या आयोजन केले होते.
याचे संपूर्ण नियोजन रेडॉन रायडरची कोर कमिटी ॲड. नरेश शेळके आणि डॉ. किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रेडॉन कमिटी मधून अभिषेक सिंग, राम फुटाणे, जेरी, सचिन खुडे, सचिन तलवार, मृणाल पठाडे, आदिती दरवटकर यांनी केले.
तसेच रमेश (रोलीन वूल्फस ), सॅवियो (लायकन्स), स्वरूप कोंढाळकर (रिअल राफ्टर्स ), पंकज भंडारी (पुणे वंडरर्स), फैझ, अमन या सहभागी ग्रुप आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष  सहकार्य केले

Leave a Reply

%d bloggers like this: