Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

PMP : रक्षाबंधन सणानिमित्त जादा बसेस सोडणार

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी बुधवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी “रक्षाबंधन” सणानिमित्त परिवहन महामंडळामार्फत मार्गावर धावणाऱ्या दैनंदिन बस संख्येपेक्षा जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
दरवर्षी “रक्षाबंधन”चे दिवशी मोठ्या संख्येने प्रवासीवर्ग प्रवास करीत असतो. यास्तव दरवर्षी प्रमाणे परिवहन महामंडळाने “रक्षाबंधन”चे दिवशी प्रवाशांची जास्तीत जास्त सोय होण्यासाठी दैनंदिन संचलनात असलेल्या नियोजित १८३७ बसेस व्यतिरिक्त जादा ९६ बसेस अशा एकूण १९३३ बसेसचा ताफा महामंडळाकडून मार्गावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. सदरील जादा बसेस ह्या गर्दीच्या मुख्य बस स्थानकांवरून कात्रज, चिंचवड, निगडी, सासवड, हडपसर, वाघोली, जेजुरी, आळंदी, भोसरी, तळेगांव, राजगुरूनगर व देहूगांव इत्यादी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत.

याकरिता वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच महत्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. “रक्षाबंधन” बुधवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी असल्यामुळे यावर्षी दिनांक ३० व ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी जादा बसेसचे नियोजन केलेले आहे. तसेच महामंडळाकडील अधिकारी, लिपीक व इतर कर्मचारी यांची महत्वाच्या स्थानकांवर व थांब्यांवर प्रवाशांना मार्गदर्शन करणेकामी व वाहतूक नियंत्रण करणेकामी नेमणूक करण्यात आली आहे. तरी पीएमपीएमएल कडून बुधवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी “रक्षाबंधन” या सणाचे दिवशी उपलब्ध करण्यात आलेल्या जादा बसेसची नोंद घेवून जास्तीत जास्त प्रवासी नागरिकांनी सार्वजनिक प्रवासी वाहतूक बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading