Sunday, October 18, 2026
Latest NewsMAHARASHTRASports

बालेवाडी येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे उद्या आयोजन – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

हा पुरस्कार प्रदान सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतीत संपन्न होणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्री बनसोडे म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, तसेच क्रिडापट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या सोहळयात तीन वर्षांचे एकूण ११९ पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार (सन २०१९-२० ) श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे) यांना, (सन २०२०-२१) श्री दिलीप बळवंत वेंगसरकर आणि (सन २०२१-२२) आदिल जहांगिर सुमारीवाला, (मुंबई) यांना प्रदान करण्यात येणार असून विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे मंत्री  बनसोडे यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील , विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading