fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

अहमदनगरचे विकास वाघ यांनी जिंकली आयवूमी जीतएक्स

मुंबई : आयवूमी, या भारतातील सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होत असलेल्या ओईएमने स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधनाच्या आपल्या मोठ्या गिव्हअवेच्या भाग्यशाली विजेत्याच्या नावाची घोषणा केली आहे. या लकी ड्रॉमार्फत आयवूमीने आयवूमी जीतएक्सचे महाबक्षीस दिले आहे. भाग्यवान विजेता श्री विकास भाऊसाहेब वाघ हे महाराष्ट्रातील अहमदनगरचे राहणारे आहेत. आयवूमी गिव्हअवेमध्ये भाग घेतलेल्या हजारो लोकांमधून त्यांची निवड करण्यात आली आहे.

अतिशय अनोखा व अभूतपूर्व असा हा उपक्रम आयवूमीने ग्राहकांनी ब्रँडवर दर्शवलेल्या विश्वासासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केला होता. आधुनिक आयवूमी जीतएक्स १००% भारतात तयार करण्यात आली आहे. अमेंडमेंट III फेज १ अंतर्गत, एआयएस १५६ सर्टिफिकेशन असल्याने आता आयवूमी जीतएक्स अजून जास्त सुरक्षित आहे. जीतएक्सचे स्टायलिश व मिनिमलिस्ट डिझाईन सर्वांचे लक्ष वेधून घेते. नव्या डिझाईनमध्ये उत्पादनाचे एकंदरीत सौंदर्य वाढवून त्याला प्रीमियम लूक दिला गेला आहे.

आयवूमीचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन भंडारी यांनी सांगितले, “आजवरच्या आमच्या सर्वात मोठ्या गिव्हअवेची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमचे ग्राहकच आमचे विश्व आहे. ब्रँडवर त्यांनी दर्शवलेल्या विश्वासाप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी आम्ही हा गिव्हअवे करत आहोत. ग्राहकांसोबतचे आमचे नाते अधिक दृढ व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. हे गिव्हअवे आमच्या कृतज्ञतेचे एक छोटे प्रतीक आहे.”

नावीन्यपूर्णतेचा ध्यास असलेला आणि समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील ब्रँड म्हणून आयवूमीने बक्षीस म्हणून जीतएक्स देऊन पर्यावरणानुकूल वाहतुकीमध्ये योगदान देण्याची संधी प्रदान केली आहे. प्रमोशनल काळात आयवूमी शोरूममध्ये येऊन लकी ड्रॉसाठी रजिस्टर करणाऱ्या ग्राहकांमधून भाग्यवान विजेत्यांची निवड एका रँडम सिलेक्शन प्रोसेसमार्फत केली गेली आहे.

Leave a Reply

%d