fbpx
Tuesday, September 26, 2023
ENTERTAINMENTLatest News

मास्टरशेफ इंडियाच्या नवीन सीझनमध्ये शेफ पूजा धिंग्रा शेफ विकास आणि शेफ रणवीर जज म्हणून सज्ज होणार

मास्टरशेफ इंडियाने देशभरातील लाखो लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. हा कुकिंग रिअ‍ॅलिटी शो खाद्यप्रेमींचा सर्वात लाडका कार्यक्रम असून आता मास्टरशेफ इंडियाच्या आगामी सीझनमध्ये शेफ पूजा धिंग्रा देखील दिसणार आहे. तिने गेल्या सीझनमध्ये गेस्ट जज म्हणून प्रवेश केला होता आणि आता मास्टरशेफ इंडियाच्या आगामी सीझनमध्ये शेफ विकास खन्ना आणि शेफ रणवीर ब्रार यांच्यासोबत ती जजच्या भूमिकेत उतरणार आहे.

शेफ पूजाने आपला उत्साह व्यक्त करत म्हंटले, “मास्टरशेफ इंडिया हे होम शेफसाठी एक अतुलनीय व्यासपीठ आहे. स्वयंपाकातील दिग्गज शेफ विकास खन्ना आणि शेफ रणवीर ब्रार यांच्यासोबत मास्टरशेफ इंडियाच्या जजिंग पॅनेलमध्ये सामील होताना मला आनंद होत आहे. या कार्यक्रमात जज म्हणून सामील होण्याची आणि शेफ विकास आणि शेफ रणवीर यांसारख्या उल्लेखनीय मार्गदर्शकांसोबत मला काम करायची संधी मिळाली आहे यासाठी मी नम्र आणि कृतज्ञ आहे. आम्ही एकत्रितपणे नाविन्यपूर्णतेला प्रेरणा देण्याचे आणि पाककला मास्टर्सच्या पुढील पिढीचा शोध घेण्याचे उद्दिष्ट ठेवून जजिंग करू. मास्टरशेफ इंडिया या कार्यक्रमाची प्रेक्षकांइतकीच आम्हाला देखील उत्सुकता आहे.”

मास्टरशेफ इंडियाचे जज म्हणून पूजा धिंग्रा लाडके सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना आणि रणवीर ब्रार यांच्यासोबत काम करणार आहे. एकत्रितपणे, ते समर्पित स्पर्धकांना मार्गदर्शन करतील आणि प्रेरणा देतील.

मास्टरशेफ इंडिया लवकरच फक्त सोनी लिव्हवर सज्ज होणार आहे!

Leave a Reply

%d bloggers like this: