fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

चिंचवड पोलीस ठाणे व पोलीस फ्रेंड्स असोसिएशनच्या वतीने माजी सैनिक व ज्येष्ठाचा सन्मान 

पिंपरी :  देशासाठी केलेले उत्कृष्ट समर्पण व देशसेवा, तसेच समाजसेवेची दखल घेऊन चिंचवड पोलीस ठाणे व पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे व पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या हस्ते करण्यात आला.
सैनिक युवा फोर्सचे संचालक कारगिल समर सेनानी रामदास मदने, कारगिल युद्धातील सहभागी हवालदार अशोक जाधव, एस.वाय. एफ. सोल्जर अकॅडमीचे सह संचालक एन. एस. जी. कमांडो चंद्रकांत कडलग, पॅरा कमांडो विलास निकम, वीर पत्नी सुनिता चव्हाण, जगमोहन धिंग्रा, चंदन सिंग, डॉ. तनप्रीत कौर मेहता, गुरुप्रीत कौर हंसपाल, भीमराव महाडिक, तसेच चाळीस ज्येष्ठ नागरिक आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे युवक अध्यक्ष शुभम चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उषा खामकर, पोलीस उपनिरीक्षक राजेश मोरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजीत सिंह, जसमीत सिंह, हवालदार सागर आढारी, हवालदार संतोष उभे, महिला पोलीस अंमलदार आम्रपाली कांबळे, राकेश सायकर, उदय वाडेकर, अनुज शहा, रविकांत सागवेकर, विनायक जगताप, उमेश मस्के, कुणाल भरम, सोमेश्वर घायाळ, अक्षय गायकवाड, दिनेश मस्के, बबलू तुपे, प्रसाद बाविस्कर, सागर भोसले, उदय वाघ उपस्थित होते.
चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले, की जवानांचा देशाप्रती खूप मोठा त्याग व योगदान आहे. तर ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा फायदा आजच्या तरुणाईने घेऊन त्या मार्गांवरून चालण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
गजानन चिंचवडे म्हणाले, की ऊन, वारा, पाऊस सोसत जवान आपल्या देशाचे रक्षण करीत असतात. त्यांच्या प्रती आपला स्नेह कायम राखून आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. याच हेतूने माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
 कार्यक्रमाचे नियोजन सागर आढारी व कमलजीत सिंह यांनी केले.

Leave a Reply

%d