Skating : कणाद लातुरकरचा विश्वविक्रम
पुणे : कणाद लातुरकर या विद्यार्थ्याने सांघिक गटात 100 मीटर स्केटिंग केवळ 11.21 सेकंदात पूर्ण करून विश्वविक्रम केला.गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने या विक्रमाची नोंद घेतली. कणाद डीईएस प्रायमरी स्कूलमध्ये इयत्ता चौथीतशिकत आहे.
बेळगावच्या ‘शिवगंगा स्पोर्टस् अकादमी ऑफ स्केटिंग’ने गेल्या मे महिन्यात केलेल्या 48 तासांच्या निरंतर स्केटिंगची नोंद गिनीज बुकमध्ये झाली. विविध वयोगटातील 350 स्केटर्सनी या उपक्रमात सहभागी घेतला प्रत्येक गटाने निर्धारित वेळेत दीड तास स्केटिंग केले. शेवटी सर्व गटांतील सहभागींनी 100 मीटरसाठी 11.21 सेकंदाची सर्वात विक्रमी वेळ नोंदविली.
‘युवराज स्पोटर्स क्लब’च्या चंद्रकांत बासा यांच्याकडे कणाद स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे. कणादच्या गटात पुण्यातील पुढील विद्यार्थ्यांचा समावेश होता. राधिका जोशी, ऋग्वेद पावसकर, श्री अनन्या अमानचरला, ओवी फिरोदिया, कणाद लातुरकर, आराध्या दळवी.
डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रा. स्वाती जोगळेकर, शाला समितीच्या अध्यक्षा ॲड. राजश्री ठकार, मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांनी कणादचे अभिनंदन केले.