fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

काइ इंडियाने स्टेनलेस स्टील नेल क्लिपर्स केले लाँच

पुणे : अपवादात्मक दर्जाची स्वयंपाकघरातील साधने व सौंदर्यप्रसाधनाची उपकरणे घडवण्याचा ११४ वर्षांचा वारसा गाठीशी असलेल्या जपानमधील काइ या आघाडीच्या ब्रॅण्डच्या काइ इंडिया या भारतातील उपकंपनीने १०० टक्के स्टेनलेस स्टीलमध्ये तयार केलेल्या नेल क्लिपरची घोषणा मोठ्या अभिमानाने केली आहे. काळाच्या कसोटीवर अखंडितपणे उतरलेल्या जपानी कारागिरीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन तयार करण्यात आलेले हे नेल क्लिपर अचूकता, टिकाऊपणा व सोयीस्करपणा यांचा एक अभूतपूर्व मापदंड स्थापित करते.

त्सुमेकिरीची (नेल क्लिपर) रचना आटोपशीर आणि एर्गोनॉमिक आहे, त्यामुळे नखे कापण्याचे काम विनासायास होते. या उपकरणाची तरफ मजबूत करण्यात आल्यामुळे कार्यात्मकता सुधारते आणि वापरासाठी ते सोपे होते. उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलमध्ये घडवलेल्या या नेल क्लिपरमध्ये सातत्यपूर्ण काठिण्य व स्थैर्य आहे. त्यामुळे त्याची धार कायम राहते आणि प्रत्येक वापराच्या वेळी नखे अचूकपणे कापली जातात. जास्त जोर लावून नखे कापण्याच्या सवयीला आता निरोप देऊन टाका. काइ नेल क्लिपरच्या इंटेलिजंट डिझाइनमुळे नखे काढण्यासाठी जास्त जोर लावण्याची गरज नाही. नखे कापण्याचा अनुभव त्यामुळे अत्यंत आरामदायी व कार्यक्षम होतो.

“ग्राहकांचा दैनंदिन अनुभव अधिक उत्तम करणारी साधने घडवणे हे काइ इंडियाचे उद्दिष्ट आहे.”

काइ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश यू. पंड्या म्हणाले.जपानी डिझाइन आणि इंजिनीअरिंगचे मर्म या उत्पादनात एकत्र आले आहे आणि त्यायोगे अद्वितीय दर्जा व टिकाऊपणाची खात्री झाली आहे. नखे कापण्याच्या कामाव्यतिरिक्त हे नेल क्लिपर नखांची सर्वांगीण काळजी घेणारे उत्पादन आहे. यामध्ये नेल फाइल आणि ग्राइम रिमुव्हर (नखातील मळ काढण्याचे उपकरण) आहे. त्यामुळे नखांना आकार देणे व ती स्वच्छ करण्याचे कामही या नेल क्लिपरद्वारे विनासायास होऊ शकते. आमचा उत्कृष्टतेचा ध्यास या त्सुमेरिकी नेल क्लिपरमध्ये सामावला आहे. त्याचप्रमाणे जपानी डिझाइन व इंजिनीअरिंगचा कळस या उत्पादनामध्ये गाठला गेला आहे,

काइ इंडियाचे नेल क्लिपर पुढील लिंकवर जाऊन केवळ १९९ रुपयांत खरेदी केले जाऊ शकते -https://kaiindiaonline.com. त्याचप्रमाणे विविध आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरूनही ते खरेदी केले जाऊ शकते. हे नेल क्लिपर ७ वेगवेगळ्या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Reply

%d