fbpx
Tuesday, October 3, 2023
BusinessLatest News

डिजिटल पेमेंट सुविधा पुरवठादार फायकॉमर्सचा  सिंगापूरमधून कामकाजाचा शुभारंभ

पुणे : भारतातील अग्रगण्य पेमेंट एग्रीगेटर आणि वित्तीय प्लॅटफॉर्म असलेल्या फायकॉमर्सने (PhiCommerce) त्याच्या सिंगापूर येथील नवीन कार्यालयाद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार करत असल्याची घोषणा केली.

फायकॉमर्स ही नवीन-युगाची आर्थिक तंत्रज्ञानवर आधारित कंपनी असून डिजिटल पेमेंटसाठीच्या पायाभूत सुविधांच्या विकसित गरजा पूर्ण करते. विविध चॅनेलमध्ये सक्रीय असलेला आणि संच निरपेक्ष डिजिटल पेमेंट प्रोसेसिंग मंच अर्थात पेफिल हा मंच पेमेंट संबंधित प्रक्रिया स्वयंचलितएकत्रित आणि सुव्यवस्थितरित्या करण्यासाठी स्वयंचलित पध्दतीने कार्यान्वित राहतो आणि व्यवसायांना डिजिटल पेमेंट इकोप्रणाली स्वीकारण्यास सक्षम करतो.

आमच्या वाढीच्या प्रवासात हा विस्तार एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतीय पेमेंट उद्योगात या परिवर्तनाचे नेतृत्व करणार्‍या काही स्थानिक कंपन्यांपैकी फायकॉमर्स एक प्रमुख कंपनी आहे. सिंगापूरमधील आमचा प्रवेश आणि तेथील उपस्थिती आम्हाला या प्रमुख क्षेत्रांमध्ये आमच्या मौल्यवान ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्याची संधी देईलचपण त्याचबरोबर पेमेंट तंत्रज्ञान पर्यायांच्या बाबतीत एक नेतृत्व म्हणून आमचा पायासुध्दा मजबूत करेल. सिंगापूरमध्ये पेमेंट व्यवसायातील लवचिकता आणि विकसित होत जाणारी तंत्रशाली इकोसिस्टीम हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित पर्याय सादर करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी तंतोतंत जुळतात आणि हे तंत्रज्ञान आशियाआखात आणि अन्य देशातील व्यवसायांना बळकट करतेअशी टिप्पणी फायकॉमर्सचे सीईओ जोस थाट्टील (Thattil) यांनी केली.

फायकॉमर्स व्यवसायबँका आणि साखळी प्रणाली यांना व्यापक (एंड टू एंड)एकत्रित तसेच विविध माध्यमातून डिजीटल पेमेंटसाठी सुविधा प्रदान करते. त्याआधारे या सर्व घटकांना एक सरळसोपीसुरक्षितव्यापक स्वरुप असलेली मजबूत आणि अडथळाविरहीत पेमेंट अनुभव देत व्यवसायांच्या जटिल डिजिटल पेमेंट गरजा सहज पूर्ण करते. 

Leave a Reply

%d bloggers like this: