Monday, August 31, 2026
Latest NewsSports

नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत एकुण 160 खेळाडू सहभागी

 
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात सोहम गाडगीळ(बेलवलकर बॉबकॅट्स, 3300पॉईंट्स), प्रतीक धर्माधिकारी(रावेतकर कॉमेट्स, 3300पॉईंट्स),अनिश राणे(बेलवलकर बॉबकॅट्स, 3200पॉईंट्स), तेजस किंजवडेकर(इम्पेरियल स्वान्स, 3100 पॉईंट्स) हे खेळाडू महागडे ठरले आहेत. ही स्पर्धा 22  ते  27 ऑगस्ट 2023 या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे.
 
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे,  मानद सचिव सारंग लागु आणि ट्रूस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे नववे वर्ष असून स्पर्धेला ट्रूस्पेस यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत नॉमिनेटेड खेळाडू गट, महिला गट, वाईजमन गट आणि खुला गट अशा विविध गटातून 160 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धकांची निवड लिलाव पध्दतीने करण्यातआली असून 8 संघांमध्ये याची विभागणी करण्यात आली आहे.
 
या स्पर्धेला पाठिंबा देऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे. कारण या स्पर्धेद्वारे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकलो असे आश्विन त्रिमल यांनी सांगितले.
 
एक खेळाडू टायमध्ये फक्त 1 सामना खेळू शकणार आहे. प्रत्येक टायमध्ये 8 सामने खेळण्यात येणार आहेत. सर्व सामने हे बेस्ट ऑफ थ्री पद्धतीत खेळविण्यात येणार असून पहिल्या दोन सामन्यात बरोबरी झाल्यास निर्णायक सामना खेळविण्यात येणार आहे.
 
ही स्पर्धा साखळी पध्दतीने होणार असून अ गटातील अव्वल संघ व ब गटातील अव्वल संघ क्वालिफायर १ लढतीत खेळणार आहे, तर दोन्ही गटातील उपविजेते संघ एलिमिनेटर १ लढत खेळणार आहेत. क्वालिफायर १ लढतीतील पराभूत संघ आणि एलिमिनेटर १ मधील विजेता संघ क्वालिफायर २ मध्ये खेळतील. क्वालिफायर १ मधील विजेता संघ अंतिम सामना खेळेल. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात येणार असल्याचे क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे यांनी सांगितले. नंदन डोंगरे स्पर्धा संचालक म्हणून काम पाहतील.
 
या वर्षीच्या स्पर्धेचे वौशिष्ट म्हणजे या वर्षी स्पर्धेत सर्वाधीक 160  स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला खेळता यावे अशा पध्दतीने स्पर्धेचे स्वरूप करण्यात आले आहे. महिला व लहान मुलांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यावर आमचा भर होता. संघातील प्रत्येक स्पर्धकाने किमान एक सामना खेळल्यास  या वर्षी प्रत्येक संघाला शंभर टक्के सहभागासाठी 3 बोनस गुण देण्यात येणार आहेत.
 
8 संघांची अ व ब अशा दोन गटांमध्ये प्रत्येकी  4संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ एकमेकांशी सामना खेळणार आहे. साखळी फेरीतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. एका टाय मध्ये ७ खुले गटाचे दुहेरी सामने आणि 1 मिश्र दुहेरी सामना असे एकूण ८ सामने होतील.
 
स्पर्धेतील आठ संघांतील खेळाडूंची निवड हि लिलावपद्धतीने करण्यात आली आहे. या संघांमध्ये ऑप्टीमा फाल्कन्स(अभिजीत राजवाडे), कॅप्स रेव्हन्स(केदार नाडगोंडे आणि प्रीती सप्रे),ब्लॅक हॉक्स(आलोक तेलंग), रावेतकर कॉमेट्स(अमोल रावेतकर व पराग चोपडा), इम्पेरिअल स्वान्स(आदित्य काळे),द ईगल्स (विनायक बापट व अमित देवधर), बेलवलकर बॉबकॅट्स(नकुल बेलवलकर), सेइनुमेरो जालन गोशॉक(तुषार मेंगळे व समीर जालान) हे 8 संघ झुंजणार असल्याचे ताम्हाणे यांनी नमुद केले.    
 
स्पर्धेसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, यामध्ये तन्मय आगाशे, सारंग लागु, अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, विवेक सराफ, रणजित पांडे, केदार नाडगोंडे, समीर जालन आणि दिप्ती सरदेसाई यांचा समावेश आहे.
 
स्पर्धेतील सहभागी संघांची व संघातील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:
बेलवलकर बॉबकॅट्स : अनिश राणे, नकुल बेलवलकर, सोहम गाडगीळ, राधा बेलवलकर, राजश्री भावे, आदित्य गांधी, सारा नवरे, अभिजीत खानविलकर, अनिल कुलकर्णी, सोहम कांगो, नील बेलवलकर, चिन्मय जोशी, इशान लागू, सिद्धांत खिंवसरा, हरीश अय्यर, साकेत गोडबोले, देवेन शेवाळे, समीहान मेहेंदळे , अनिल आगाशे ;
 
ब्लॅक हॉक्स : राधिका इंगळहळीकर, तन्मय आगाशे, मिहीर विंजे, निखिल चितळे, भाग्यश्री देशपांडे, गौरी कुलकर्णी, विष्णू गोखले, आदित्य जितकर, आनंद परचुरे, अनिल देडगे, विनायक भिडे, स्वरूप कुलकर्णी, विश्वेश कट्क्कर, अमोल काणे, गौतम लोणकर, अक्षय ओक, निलेश केळकर , आनंद शहा , गिरीश खिंवसरा , दिशा शहा;
 
द इगल्स: अमित देवधर, जयदीप गोखले, सिद्धार्थ साठे, चिन्मय चिरपुटकर, संध्या भट, ज्योती राणे, संग्राम पाटील, सुधांशू मेडसीकर, यश मेहेंदळे, नीलेश बजाज, बाळ कुलकर्णी, कर्ना मेहता, प्रशांत वैद्य, संजय परांडे, संदीप साठे, जयदीप कुंटे, जयकांत वैद्य, हर्षा जैन, दिया मुथा
 
ऑप्टिमा फाल्कन्स : मकरंद चितळे, अभिजीत राजवाडे, योहान खिंवसरा, आरुषी पांडे, ऋषिका आपटे, मिहीर आपटे, नितीन कोनकर, देवेंद्र चितळे, यश काळे, जितेंद्र केळकर, चंद्रशेखर आपटे, अमर श्रॉफ, आदित्य अभ्यंकर, यशोधन पानसे, अभिजीत गानू, चैतन्य वाळिंबे, अथर्व राजे , संजय शहा , हिमांशू थोरात , माधवी गोखले
 
इम्पेरियल स्वान्स: आदित्य काळे, अनिश रुईकर, तेजस किंजवडेकर, नेहा लागू, सिद्धार्थ निवसरकर, रुचा ढवळीकर, सारंग आठवले, निशांत भनगे, नीरज दांडेकर, अतुल ठोंबरे, अर्जुन खानविलकर, दत्ता देशपांडे, समीर वर्तक, विश्वास मोकाशी, मनीष शहा, यश शहा, सोहम मोहरीर, अमेय वाकणकर, प्रणव धनेश्वर, नरेंद्र पटवर्धन
 
कॅप्स रेवन्स : केदार नाडगोंडे, विक्रांत पाटील, प्रांजली नाडगोंडे, सानिका ओक, तेजस चितळे, बिपीन चोभे, विनित रुकारी, गिरीश मुजुमदार, मिहीर ठोंबरे, रोहित भालेराव, आदित पाबळकर, अमोल मेहेंदळे, अविनाश दोशी, तन्मय चितळे, कुणाल शहा, देवेंद्र राठी,  नील हळबे , हर्षद जोगाईकर , मंदार विंझे, सुचित्रा जोशी
 
रावेतकर कॉमेट्स: अदिती रोडे, पराग चोपडा, तन्मय चोभे, प्रतिक धर्माधिकारी, शुक्रिता पिसाळ-देशमुख, आनंदिता गोडबोले, सचिन जोशी, जयदीप वाकणकर, रोहित साठे, संजय फेरवाणी, पार्थ केळकर, निखिल कानिटकर, आनंद घाटे,अनुज मेहता, विनीत राठी,  रमणलाल जैन, शिवकुमार जावडेकर, हेमंत पालांडे, आदित्य गोखले, अभय राजगुरू;
 
सेइनुमेरो जालन गोशॉक:समीर जालान, तुषार मेंगळे, रोहित मेहेंदळे, ईशा घैसास, मिताली कुलकर्णी, नैमिष पालेकर, कल्याणी लिमये-विंझे, बिपिन देव, तुषार नगरकर, विमल हंसराज, सुदर्शन बिहाणी, गौरव पाटील, विक्रम ओगले, रोहन पै, आशुतोष सोमण, प्रशांत कुलकर्णी , मधुर इंगळहळीकर , अनिकेत सहस्रबुद्धे , कपिल बाफना

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading