Thursday, May 14, 2026
Latest NewsLIFESTYLE

ईझ परफ्यूम तर्फे ‘स्लो चिता’ बरोबर सेंट्रो, पुणे येथे एक संगीतमय संध्याकाळ

पुणे : सुगंध घटकांचे आघाडीचे उत्पादक असलेल्या सवाई फ्रॅग्रन्सचा पहिला D2C परफ्यूम – ‘ईझ परफ्यूम’तर्फे डायनॅमिक रॅप कलाकार ‘स्लो चिता’ याच्या बरोबर एक अनोखी संध्याकाळ सादर करण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4:00 ते संध्याकाळी 6:00 या वेळात सेंट्रो, कर्वे रोड, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न होईल.

या कार्यक्रमाद्वारे ईझ परफ्यूम सुगंधांचे मंत्रमुग्ध करणारे जग आणि संगीताच्या लयबद्ध तालांना एका अविस्मरणीय अनुभवात एकत्र आणण्याचे वचन पुणेकरांना देत आहे. सुगंध आणि ध्वनी या संवेदना एकमेकांत गुंफत #ExpressYourEze या ब्रँड थीमसह संवेदनांची एक अनोखी सिम्फनी तयार करण्यासाठी ईझ परफ्यूम सज्ज आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कलात्मक अभिव्यक्तींच्या संमिश्रणाने ‘स्लो चिता’ आणि ‘ईझ परफ्यूम’ यांच्यातील उल्लेखनीय भागीदारीने एक चिरतरुण संध्याकाळ प्रेक्षकांना अनुभवता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading