स्वातंत्र्य दिनानिमित्त अंध विद्यार्थ्यांनी साकारला 30 फुटी तिरंगा
पुणे : 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने औचित्य साधून कलाविष्कार ड्रॉइंग क्लासेस सहकार नगर पुणे तर्फे 30 फुटी भारताचा तिरंगा त्यांच्या हाताचे ठसे उमटवून तयार करण्यात आला. कलाविष्कार ड्रॉइंग क्लासेसच्या संचालिका गिरिजा कोंडे देशमुख यांच्या संकल्पनेतून ही तिरंग्याची प्रतिकृती साकारण्यात आली.

अंध मुलांची शाळा कोरेगाव पार्क पुणे येथे 150 अंध मुलांकडून त्यामधे त्यांचे सर्व विद्यार्थी पालक वर्ग आणि परिवारातील सदस्य यांचा सहभाग होता. यातून भारत मातेला एक वेगळया प्रकारे सलामी देण्याचा प्रयत्न क्लास च्या संचालिका गिरिजा कोंडे यांनी केलेला आहे. यामधे शाळेचे विद्यार्थी आणि शाळेचे संचालक श्री. कृष्णा शेवाळे आणि शिक्षिका हुमा शाह इतर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गाऊन आणि कलाविष्कार क्लास च्या विद्यार्थ्यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करून झाली. यानंतर हा झेंडा तळजाई येथील क्रिकेट च्या मैदानावर मांडून सर्व विद्यार्थी पालक यांच्यातर्फे सलामी देण्यात आली.
