विविध आजारांवर मात करण्यासाठी सपोर्ट ग्रुप ची गरज – पं. रामदास पळसुले यांचे मत
पुणे : आपण आपलं शरीर म्हणतो मात्र बारकाईने अभ्यास केला तर तर ते आपल नाही हे लक्षात येते, कारण आपल्या शरीरातील क्रिया या आप्ल्या नकळत होत असतात. आपण या समाजात राहतो या समाजाचे देणे लागतो हे कायम लक्षात ठेवले पहिजे. यामुळेच समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध आजारांच्या सपोर्ट ग्रुप ची आवशकता आहे असे मत ज्येष्ठ तबलावादक पं. रामदास पळसुले यांनी केले.
किडनी सपोर्ट ग्रुप च्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पळसुले बोलत होते.
याप्रसगी ज्येष्ठ मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. दिलीप कदम यांचे कोरोनाचे दूरगामी परिणाम तर ज्येष्ठ मानसोपारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके यांचे दीर्घकालीन आजाराशी लढा या विषयावर व्याखयान झाले. यावेळी किडनी सपोर्ट ग्रुप चे अध्यक्ष अरुण देवगावकर, प्रशांत भोंडे, गजानन कडलक, मुकुल नातू, आरती देवगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पं. पळसुले म्हणाले, समाजासाठी काही काम करायचे म्हणजे ते आर्थिक मदत स्वरूपातच असायला पाहिजे असे नाही, वेळ आणि मदत यातूनही ते होत असते. संगीताच्या माध्यमातून मनावर सकारात्मक परिणाम होत असतात हे लक्षात घेऊन मनाच्या आरोग्यासठीही सांगीतिक उपचार पद्धती उपयुक्त असते असेही त्यांनी सांगितले.
डॉ. दिलीप कदम म्हणाले, कोरोना झालेल्या रुग्णांना आजारातून बरे झाल्यानंतर विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. विशेषतः मधुमेह, रक्तदाब ज्यांना आहे अशा रुग्णांना किडनी आजर उद्भवू शकतात असे निरीक्षण आहे. यामुळे रुग्णांनी काळजी घेण्याची गरज आहे.
डॉ. उल्हास लुकतुके म्हणाले, कोरोना संपला असला तरी त्याचे परिणाम दीर्घकालीन आहेत कारण तो जुनाट आजार आहे. त्यातून मनावर जे परिणाम झाले आहेत त्यासाठी सकारात्मक विचार हेच औषध महत्त्वाचे आहे.
यावेळी कोरोना काळात किडनी रुग्णांना डायलिसिस व अन्य उपचारांसाठी मदत करणाऱ्या मोहना पळसुले आणि मुकुल गानु यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण देवगावकर यांनी केले तर आभार आरती देवगावकर यांनी मानले.
