आगामी सर्वच निवडणुका बहुजन जनता दल लढणार राज्यस्तरीय आढावा बैठकीत निर्णय
पुणे : आगामी काळात होणाऱ्या सर्वच निवडणुका बहुजन जनता दल लढणार असून राज्यात बहुजन जनता दल पक्ष संघटन वाढवण्यावर भर राहील व संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी परभाग शाखा समित्या अधिका अधिक सक्षम करा बहुजन जनता दलाने दिलेले कार्यक्रमाचे अधिका अधिक नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करावे बहुजन जनता दलाच्या राज्यातील प्रभाग शाखा मजबूत तर राज्यात बहुजन जनता दल संघटन मजबूत आणि संघटन मजबूत असेल तर राज्यात होणाऱ्या आगामी सर्वच निवडणुका लढवण्यासाठी बहुजन जनता दलाला जड जाणार नाहीत राज्यातील ग्रामीण भागातील युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिक व मतदार आणि नव मतदार सामान्य नागरिकांपर्यंत सतत संपर्क ठेवून बहुजन जनता दलाच्या राज्यातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणीसह हर घर बहुजन जनता दल आणि गाव तेथे बहुजन जनता दल शाखा स्थापन या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आव्हान बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी केले आहे.
बहुजन जनता दलाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता व पदाधिकारी आणि राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्षांची आढावा बैठक पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयात आज झाली सदर बैठकीमध्ये बहुजन जनता दलची संघटणत्मक बांधणी बहुजन जनता दलाचे असलेल्या अॕपद्वारे राज्यातील सामान्य नागरिकांशी सतत संपर्क करून घर घर बहुजन जनता दल आणि गाव तेथे बहुजन जनता दर शाखा स्थापन करणे या अभियानासंदर्भात मार्गदर्शन करताना बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे बोलत होते.
यावेळी अंकुश पवारे प्रदेशउपाध्यक्ष .संजय वानखडे प्रदेश सचिव. दीपक पाटील प्रदेश संघटक.रेखा ठाकूर प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी.सुभाष सुरवाडे .किशोर मोरोड .प्रवीण शिंगाडे .भगवान करे .राजेंद्र गायकवाड .दिपक निगडे .शंकर संसाने .मनिष म्हैसकर .दशरथ यादव .नरेश गजभिये .कैलास देशभ्रतार .अश्विन चांदुरकर .यांच्यासह बहुजन जनता दलाच्या सर्व आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते
