Tuesday, October 20, 2026
Latest NewsSports

६०व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेत देशभरातून ३५९ खेळाडू सहभागी 

पुणे : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित ६०व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेत २५ राज्यांतील ३५९ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा बॉक्सिंग हॉल श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे १६ ते २६ ऑगस्ट २०२३ या कालावधीत होणार आहे.  
 
पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे आणि कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी सांगितले की, हि राष्ट्रीय स्पर्धा स्विस लीग फॉरमॅटमध्ये ११ फेऱ्यांमध्ये होणार आहे. स्पर्धेत एकूण ३० लाख रुपये पारितोषिक रक्कम देण्यात येणार आहे.  स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व फिडे यांच्या मान्यतेखाली करण्यात आले आहे. यावेळी पीडीसीसीचे उपाध्यक्ष अश्विन त्रिमल, उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, आयए राजेंद्र शिदोरे, विनिता श्रोत्री आणि दिप्ती शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
एमसीएचे उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे आणि मानद सचिव श्री निरंजन गोडबोले पुढे म्हणाले की, स्पर्धेत महाराष्ट्र, दिल्ली, आसाम, हरियाणा, नागालँड, गोवा, चंदीगड, राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, हिमाचलप्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्यप्रदेश, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, पुद्दुचेरी, तेलंगणा, छत्तीसगढ, केरळ, गुजरात, बिहार, उत्तरप्रदेश या २५ राज्यांतील ३५८ रेटेड खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला ऍडव्होकेट संकेत फुके स्मृती करंडक व ६,००,०००रुपये, तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व ५,००,०००/-रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय तृतीय क्रमांकाच्या खेळाडूला करंडक व ३,००,०००/-रुपये आणि चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला करंडक व २,५०,०००/- रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे मानद सचिव श्री निरंजन गोडबोले यांनी नमूद केले.
स्पर्धेतील विजेत्या अव्वल सहा खेळाडूंची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात येणार असून हे खेळाडू या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांनी आवर्जून सांगितले.

ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता(2625,पीएसपीबी),अभिमन्यू पुराणिक (2611, एआयआय), सेथुरामन एसपी(2591,पीएसपीबी), सूर्या गांगुली(2583,पीएसपीबी), दिप्तयान घोष(2568,पश्चिम बंगाल), विग्नेश एनआर(2540, आरएसपीबी), अरोन्यक घोष(2538,आरएसपीबी), मित्रभा गुहा(2505,पश्चिम बंगाल), इनियन पी(2502,तामिळनाडू),सायंतान दास(2489,आरएसपीबी),  दिप सेनगुप्ता(2474,पीएसपीबी), आकाश जी(2456,तामिळनाडू), दीपन चक्रवर्ती जे(2446,आरएसपीबी), वेंकटेश एमआर(2434,पीएसपीबी), विष्णू प्रधान व्ही(2411,तामिळनाडू), नीलोतपाल दास(2369,पीएसपीबी), लक्ष्मण आरआर(2349,आरएसपीबी), कार्तिकेयन पी(2325,आरएसपीबी), श्रीराम झा(2316,एलआयसी), तर आंतरराष्ट्रीय मास्टर श्यामनिखिल पी(2467,आरएसपीबी), निलाश सहा(2435,पश्चिम बंगाल), अनुज श्रीवत्री(2420,मध्यप्रदेश), सिद्धांत मोहपात्रा(2420,आरएसपीबी), अर्घदीप दास(2413,आरएसपीबी), श्रीहरी एलआर(2407,तामिळनाडू), कृष्णा सीआरजी(2405,आरएसपीबी), नितीन एस(2386,आरएसपीबी), मेहर चिन्ना रेड्डी सीएच(2384,आरएसपीबी), उतसाब चॅटर्जी(2322,पश्चिम बंगाल), राजेश व्हीएव्ही(2306,आरएसपीबी), प्रसाद देवकी व्ही(2254,कर्नाटक), कोंगूवेल पोन्नूस्वामी(2250,पीएसपीबी), रत्नाकरण के(2232,आरएसपीबी), अभिषेक केळकर(2217,महाराष्ट्र), विक्रमादित्य कुलकर्णी(2208,महाराष्ट्र), दिनेश शर्मा(2203,एलआयसी), अनुप देशमुख(2143,महा),एफएम सुयोग वाघ(2221, महाराष्ट्र), डब्ल्यूआयएम हर्षिता गुड्डान्ति(2220,आंध्रप्रदेश) यांसारख्या मानांकित खेळाडूंचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading