Thursday, May 14, 2026
Latest NewsMAHARASHTRA

BEST च्या बस कंत्राटी कामगारांच्या आंदोलनास व संपाला रिपब्लिकन कामगार सेनेचा जाहिर पाठींबा


मुंबई:-रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार,मुंबई बेस्ट कंत्राटी कामगारांचे आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनास जाहिर पाठींबा, मुंबई दुसरी जीवन वाहिनी असलेली बेस्ट बस चे कंत्राटी कामगार यांची माहे वेतन वीस हजार रुपये फक्त आहे, बस बिघाड झाली किंवा कोणतेही बसला काय छोटे मोठे बिघाड बंद पडली तर त्याचे दुरुस्तीच्या नावाने कंत्राटी कामगारांच्या वेतनातून कपात करणे किंवा दंड घेणे, हे तात्काल थांबविण्यात यावे,कोरोनाच्या महामारीच्या काळात कंत्राटी कामगार स्वतःचा जीव धोक्यात घालून, बेस्ट च्या बस च्या माध्यमातून जनतेला सेवा दिली आहेत, बेस्टच्या कंत्राट कामगारांवर कोणत्याही प्रकारचे अन्याय खपून घेतले जाणार नाहीत, बेस्ट च्या कंत्राटी कामगारांच्या ईतर मागण्यांबाबत, रिपब्लिकन कामगार सेना व रिपब्लिकन कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार, रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष युवराज बनसोडे,महाराष्ट्र राज्य संघटक प्रमुख अमित गायकवाड, यांच्या मार्गदर्शनातून रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र राज्य सचिव प्रेम धांदे,महाराष्ट्र उपाध्यक्ष जालिंदर कांबळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मकरंद कांबळे उपस्थित बेस्ट कामगारांच्या आंदोलना स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने जाहीर पाठींबा दिला, यावेळी बोलताना प्रेम धांदे यांनी सांगितले की जोपर्यंत बेस्ट च्या कामगारांना न्याय मिळत नाही,तोपर्यंत रिपब्लिकन कामगार सेना,बेस्ट कंत्राटी कामगाराच्या पाटिशी खंबीरपणे उभी असून खांद्याला खांदा लावून लढा देणार आहे,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading