Thursday, May 14, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारलाचाआणखी एक चपराक

पुणे: काँग्रेसचे नेते राहूल जी गांधी यांना गुजरात न्यायालयाने दिलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली . मणीपूर हिंसाचाराकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल केंद्र सरकारला सुनावल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने ही आणखी एक चपराक केंद्र सरकारला, पर्यायाने भारतीय जनता पक्षाला लगावली आहे.
विरोधी पक्ष संपवण्याच भाजपचा कुटील डाव या स्थगितीने धुळीस मिळाला असल्याची प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली. भारत जोडो यात्रेतून संपूर्ण देशात विविधतेत एकता असे वातावरण निर्माण केलेले राहूल गांधी यांची भाजपला भीती वाटत होती. त्यामुळेच दुसऱ्या  राज्यात राहूल गांधी यांनी केलेल्या एका भाषणाचे खोटे निमित्त करून गुजरातमध्ये खटला दाखल करण्याचे कारस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रुहमंत्री अमीत शाह यांनी रचले. मात्र देशातील सर्वोच्च न्यायालयाने हे कारस्थान हाणून पाडले आहे असे जोशी म्हणाले.
आता ८,९ व १० ऑगस्ट या दिवशी संसदेत होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या चर्चेसाठी देखील राहूल गांधी सहभागी होऊ शकतील ही देशातील जनतेच्या दृष्टीने  ही उत्साहाची बाब आहे, असे जोशी यांंनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading