Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

दफनभूमीचे आरक्षण बदलल्याबद्दल मुस्लिम समाजाचे आंदोलन

पुणे : पुणे शहर दफनभूमी कृती समिती च्या वतीने पुणे महानगरपालिका येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले फायनल प्लॉट नंबर 441 स्यालेसबरी पार्क या ठिकाणी गेली अनेक वर्ष दफनभूमीचे आरक्षण आहे ,सदर आरक्षण बदलून एका उद्योगपतीला सदर भूखंड देण्याचा महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांचा मानस असल्याचा संशय आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन करून सदर जागेवर दफनभूमी आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी( अजित पवार गट ) , कॉंग्रेस पक्ष ,शिवसेना उद्धव ठाकरे , एम आय एम गट ,वंचित बहुजन आघाडी. जमिया ए उलमा हिंदी. व विविध संघटनांनी पाठिंबा दिला.
याप्रसंगी. कृती समितीचे जमीर मोमीन.अहमद सय्यद. समीर शेख.फयाज खान. फयाज शेख.जावेद खान.मो.जकाती , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर कार्याध्यक्ष प्रदीप दादा देशमुख काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे. व विविध पक्षाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading