Thursday, May 14, 2026
Latest NewsLIFESTYLE

‘ऱ्हाप्सोडी २०२३’ कलेतून सेवाभाव साधणार आगळंवेगळं प्रदर्शन 

मुंबई : आर्टिव्हल फाउंडेशनतर्फे दि ८ ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान ‘ऱ्हाप्सोडी २०२३’ या समूह प्रदर्शनाचे आयोजन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये वासुदेव कामत, प्रकाश घाडगे, प्रदिप सरकार, अजय डे, आशिफ होसेन, शशिकांत धोत्रे, गोपाल परदेशी, बिरा किशोर पात्रा, दीपक बी. पाटील, विशाल फसले, जयदेब डोलुई, गोविंद सिरसाट, संतोष भोईर, डॉ.शंकर शर्मा, प्रतिभा गोयल, मरेडू रामू, सुदिप्ता अधिकारी, कश्यप रे, ज्योत्स्ना सोनवणे. डॉ. शेफाली भुजबळ, माया बी., रमनप्रीत कौर नारंग, शैलेश गुरव  या २५ प्रतिष्ठित कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

भारतातील अनेक भागात वास्तव्य करून चित्रकला व शिल्पाकृती तयार करणाऱ्या विविध कलाकारांमधील सुप्त कलागुण हेरून त्यांना मान्यवर कलाकारांसमवेत आपली चित्रकला प्रदर्शनात ठेवण्यासाठी कलादालन उपलब्ध करून देणे व ह्या आयोजकांमधून त्यांना संभाव्य कला संग्राहक, कलाप्रेमी, रसिक वगैरेपर्यंत आपल्या कला माध्यमा मार्फत व कलाकृतीद्वारे पोहोचवणे हाच आयोजकांचा प्रमुख उद्देश आहे.

 

या कलाप्रदर्शनात निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे, वास्तवदर्शी चित्रे, ऐतिहासिक परंपरा, वारसा व संस्कृतीविशेष दाखवणारी चित्रे, धार्मिक संकल्पनांवर आधारित पारंपारिक चित्रे, आधुनिक आणि अमूर्त जीवनातील वास्तव दर्शवणाऱ्या अनेक शिल्पाकृती ठेवण्यात येणार आहेत, चित्रे तैलरंग, जलरंग, ॲक्रिलिक, मिक्स मिडिया, चारकोल या माध्यमातील असून   शिल्पाकृती संगमरवरी दगड, मेटल, सिरॅमिक कलाकृती, मिक्स मिडिया मधील  आहेत.  या प्रदर्शनात  जवळजवळ ६० कलाकृती  एकाच छताखली रसिकांना बघता येतील.

या प्रदर्शनाचे आयोजन शरद गुरव, सतीश पाटील यांनी केले आहे

चित्र, शिल्प, मिक्स मीडिया अशा वेगवेगळ्या माध्यमांतील कलाकृती रसिकांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. 

या सर्व कलाकरांच्या कलाकृती रसिकांसमोर सादर करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहेच, पण त्याच बरोबर कलेतून सेवा हे देखील या प्रदर्शनाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळेच कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA)  यांच्या सहयोगाने या प्रदर्शनाची आखणी आणि संकल्पना वेगळ्या पद्धतीनं करून प्रदर्शनामधील चित्रविक्रीतून मिळणारी काही रक्कम ही कँसर पेशंट्सना मदत म्हणून या संस्थेला देण्यात येणार आहे. 

ग्रामीण आणि शहरी भागातील नवोदित, समकालीन कलाकरांना    आपली कला प्रदर्शित करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळवून देणे हा आर्टीव्हल फाउंडेशनचा उद्देश आहे. ‘ऱ्हाप्सोडी २०२३’ हे प्रदर्शन याच प्रयत्नांचा एक भाग आहे. या प्रदर्शनात कला रसिकांना  समकालीन दृश्यकलेतील उत्तमोत्तम कलाकृतींचा आस्वाद घेता येईल. अमूर्त, क्रिएटिव्ह, वास्तववादी अशा विविध माध्यमातील आशयपूर्ण कलाकृतींचा आस्वाद कला रसिक घेऊ शकतील.  त्यामुळेच कला रसिकांनी चुकवू नये असेच हे प्रदर्शन आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading